Description
निरोगी, निकोप आणि सुदृढ बालकास जन्म देण्यासाठी गर्भाशयामध्ये त्या बालकाची वाढ पूर्णपणे होणेच आवश्यक आहे हे प्रबोधनकारांनी अचूक ओळखले होते. आपल्या प्रबोधनाचे ध्येय स्पष्ट करतानाते म्हणतात…. ‘राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सुधारणा आपोआप होतील या गोंडस तत्त्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्वास नाही, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीच्या आचारविचारांनी चिडचिडलेली, बौद्धिक क्षेत्रात जाणतेपणाचा मक्ता मूठभर सुशिक्षितांच्या हाती, बाकी सर्वत्र अज्ञानाची अमावास्येची काळीकुट्ट रात्र, औद्योगिक चतुराई ठार गेल्यामुळे आर्थिक बाबतीत सर्वत्र पसरलेले दैन्य आणि दास्य अशा विचित्र परिस्थितीत राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे राजकारणाची जुगार खेळणाऱ्या जुगारांची सट्टेबाजी होय.






Reviews
There are no reviews yet.