एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई/ Ekalavya, Shambook Aani Jhalakaareebaai

60.00

नव्या युगात आपल्याला सर्वांची एकत्रित, समन्वित संस्कृती उभी करायची असेल, तर सर्वांना रुचणारे व भेदातीत आदर्शच मानावे लागतील. आपल्या मनोगाभाऱ्यात युगानुयुगे जपून ठेवलेले आपले आदर्श भंगलेले, चिखलाने माखलेले दिसू नयेत, असे आपल्याला वाटत असेल, तर आग शमविण्यात हित आहे, भडकविण्यात नाही, हे आपण सर्वजणांनी ओळखायला हवे. आपण काय करावयास हवे, हे आपणच विवेकपूर्वक ठरवावे……. अखेरीस, विवेक, न्यायबुद्धी आणि संतुलित वृत्ती यांच्या आधारेच आपण आपली संस्कृती खऱ्या अर्थाने उज्ज्वल आणि उन्नत करू शकू !

Pages: 48

Description

आपल्या समाजाच्या इतिहासातील तीन प्रेरणादायक व्यक्तींविषयीचे हे लेखन आपल्या हाती देताना मला एक प्रकारचे समाधान वाटत आहे. हे लेखन केल्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्त झालो, अशी भावना माझ्या मनात मुळीच नाही. परंतु त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकलो, याची धन्यता नक्कीच आहे. या तीन व्यक्तींपैकी पहिल्या दोघांविषयी बहुतेकांनी खूप काही ऐकलेले, वाचलेले, लिहिलेले असते. मग माझ्या लेखनात नवीन काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यांची चरित्रे संदर्भासह, साधार नोंदवण्याचा प्रयत्न या लेखनात आहे, इतकेच याबाबतीत मी म्हणू शकतो. वीरांगना झलकारीबाईंविषयी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात माहिती नाही, म्हणून येथे ती जाणीवपूर्वक नोंदविली आहे.

डॉ. आ.ह.साळुंखे

Additional information

Weight 0.60 kg
Pages

48

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई/ Ekalavya, Shambook Aani Jhalakaareebaai”