महाबळी आणि असुर/ Mahabali Aani Asur

350.00

असुर, नावाप्रमाणेच शूर आणि सामर्थ्यशाली, त्याच कर्तृत्ववान असुरांचा महापराक्रमी सम्राट बळीराजा…

ज्यांनी प्रजेच्या सुखात आपलं सुख पाहिलं, सर्वसामान्यांना होणाऱ्या वेदनांनी ज्यांची हृदये कष्टी झालीत, त्याच संवेदनशील काळजाच्या असुरांची ही कर्तृत्वगाथा…

ज्यांनी कृषी, व्यापार, तंत्रज्ञान आणि संस्कृती यात अत्युच्च पातळी गाठली, अशा असुरांचा हा ससंदर्भ इतिहास…

ज्यांनी युद्धाच्या मैदानावर आपले प्राण वेचले, पण तत्त्वांशी द्रोह केला नाही, ज्यांनी पराभूत होणे पसंत केले पण जीवनमूल्यांशी प्रतारणा केली नाही, त्या असुरांची ही यशोगाथा…

असुर युद्धात पराभूत झाले, पण त्यांच्या मूल्यनिष्ठेची ध्वजा कायम उंचावत राहिली, त्या असुरांची ही स्मृतिगाथा…

SKU: lokayat0108 Category: Tag: Brand:

Pages: 244

Description

हडप्पा संस्कृती ही असुरांची संस्कृती होती. असुर हे अत्यंत प्रगत आणि समृद्ध होते. त्यांनी आर्य आक्रमकांना थोपवण्याचा आपल्या जीवाची पर्वा न करता खूप प्रयत्न केला. त्यांनी ही संस्कृती वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अजूनही आपल्याला कित्येक संदर्भमिळतात.

एकापेक्षा एक पराक्रमी असुर सम्राट होऊन गेले. बहुतेकांचा पराक्रमाने नव्हे, तर कपटाने पराभव करण्यात आला. खरे तर असुर हे मोठे शिवभक्त, पण त्यांनाच शिवाने पराभूत केले/ मारले इत्यादी कथा नंतर रचण्यात आल्या.

असुर हे नगररचनाकार, वास्तुविशारद तर होतेच. ते व्यापाराबरोबरच मूलतः कृषक असल्याने त्यांनी कृषीसाठी जलसंधारण व्यवस्था अत्यंत चांगल्याप्रकारे निर्माण केली होती. बंधारे, तलाव बांधले. त्यांचा जल आणि समुद्र यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे अवशेष लोककथा आणि पुरातत्त्व यातूनही उपलब्ध झाले आहेत.

Additional information

Weight 0.280 kg
Pages

244

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाबळी आणि असुर/ Mahabali Aani Asur”