त्यांना सावलीत वाढवू नका !/ Tyanna Savleet Vadhvu Naka

150.00

ऊन्ह सोसण्याची, ते पेलण्याची, ते पचवण्याची, त्याचं स्वागत करण्याची, त्याच्या स्पर्शानं मोहरण्याची शक्ती आपल्या मुलामुलींच्या व्यक्तिमत्त्वात यायला हवी.

याचा अर्थ असा नव्हे, की त्यांना सतत उन्हातच उभं करावं. अधून-मधून थंडगार सावलीचा अनुभव हवाच. सावली काही नेहमीच दुष्टावा करीत नाही. कधी कधी ऊन्ह असह्य होतं, ते सोसण्याच्या सगळ्या मर्यादा संपतात, तेव्हा अंगावर थंडगार सावली हवीहवीशी वाटतेच. ती दिलासा देते, करपून जाण्यापासून वाचवते, जळून खाक होण्याच्या सीमेवरून माघारी आणते, जगण्याची ऊर्मी प्रबळ करते. आणि सावलीचं असं माहात्म्य असूनही, आपल्या मुलामुलींनी तिचा पदर सोडून बाजूला जायचंच नाही, इतकं मात्र तिच्या मोहात पडू नये. त्यांनी योग्य वेळी तिच्यापासून अलग व्हावं. उन्हात जावं, ऊन्ह प्यावं, ऊन्ह पचवावं आणि लख्ख सूर्यप्रकाशात वाढावं, मोहरून-बहरून यावं ।

SKU: lokayat0021 Category: Tag: Brand:

Pages: 96

Description

अपेक्षाभंगाच्या बाबतीत लस टोचण्याचं तत्त्व लागू करणं शक्य आहे, असं मला वाटतं. लहानपणापासून ज्या मुलांचे अती लाड केले जातात आणि ज्यांना मागेल ते ताबडतोब मिळत गेल्यामुळं कधीच कुठल्याही अपेक्षाभंगाचा सामना करण्याचा प्रसंग आलेला नसतो, त्यांच्यावर कधी काळी एखाद्या अपेक्षाभंगाचा आघात झाला, तर लस न टोचलेल्या व्यक्तीप्रमाणं ती मुलं अपेक्षाभंगाच्या त्या आघातामुळ कोलमडून पडतात, स्वतःला सावरू शकत नाहीत, व्यसनांच्या आहारी जातात, खचून जातात वा विध्वंसक बनतात; आपलं संतुलन गमावून बसतात. याउलट, ज्यांना लहानपणापासून छोट्या-मोठ्या अपेक्षाभंगांना सामोरं जाण्याचा सराव झालेला असतो. त्यांच्यामध्ये एखाद्या फार मोठ्या अपेक्षाभंगाचा घाव सोसण्याचीही ताकत निर्माण झालेली असते. आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत, याचा विवेक त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. त्या विवेकाच्या जोरावर कुठल्याही अपेक्षाभंगाचं विष पचवून प्रमत्र मान नव्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी त्यांना त्यांच्या आतूनच ऊर्जा मिळते.

Additional information

Weight 0.120 kg
Pages

96

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “त्यांना सावलीत वाढवू नका !/ Tyanna Savleet Vadhvu Naka”