Description
अपेक्षाभंगाच्या बाबतीत लस टोचण्याचं तत्त्व लागू करणं शक्य आहे, असं मला वाटतं. लहानपणापासून ज्या मुलांचे अती लाड केले जातात आणि ज्यांना मागेल ते ताबडतोब मिळत गेल्यामुळं कधीच कुठल्याही अपेक्षाभंगाचा सामना करण्याचा प्रसंग आलेला नसतो, त्यांच्यावर कधी काळी एखाद्या अपेक्षाभंगाचा आघात झाला, तर लस न टोचलेल्या व्यक्तीप्रमाणं ती मुलं अपेक्षाभंगाच्या त्या आघातामुळ कोलमडून पडतात, स्वतःला सावरू शकत नाहीत, व्यसनांच्या आहारी जातात, खचून जातात वा विध्वंसक बनतात; आपलं संतुलन गमावून बसतात. याउलट, ज्यांना लहानपणापासून छोट्या-मोठ्या अपेक्षाभंगांना सामोरं जाण्याचा सराव झालेला असतो. त्यांच्यामध्ये एखाद्या फार मोठ्या अपेक्षाभंगाचा घाव सोसण्याचीही ताकत निर्माण झालेली असते. आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत, याचा विवेक त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. त्या विवेकाच्या जोरावर कुठल्याही अपेक्षाभंगाचं विष पचवून प्रमत्र मान नव्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी त्यांना त्यांच्या आतूनच ऊर्जा मिळते.






Reviews
There are no reviews yet.