शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात/ Shambhar Koti Mendu, Donashe Koti Hat

100.00

आपण जगाकडून सतत काही ना काही घेत असतो. स्वाभाविकच, आपणही जगाला काही ना काही दिलं पाहिजे, जगाला देण्यासारखं काही तरी आपल्या ठायी निर्मलं-साठवलं पाहिजे. आपण आपल्या अस्तित्वानं जगाला कणभर समृद्ध आणि क्षणभर आनंदी करू शकलो, तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं, असं म्हणता येईल.

SKU: lokayat0023 Category: Tag: Brand:

Pages: 72

Description

अमंगलपासून मुक्ती आणि मंगलाचा विकास, या आपल्या निकोप अस्तित्वाच्या दोन बाजू होत. या दोन्ही बाजू समान रीतीनं जपायला हव्यात.

अमंगलाला नकार देण्याच्या मार्गानं मुक्ती लाभते आणि मंगलाची निर्मिती करण्याच्या वाटेनं विकास साधतो. जे नकार न करता निर्मितीच्या मागं धावतात, त्यांची निर्मिती असत्यानं गढूळलेली आणि लाचारीनं डागाळलेली असते. याउलट, जे निर्मिती न करता नकारातच गुंतून राहतात, त्यांचा नकार वंध्यत्वानं काळवंडलेला आणि शिळेपणातच खोळंबलेला असतो. खरं तर, ज्यांना सम्यक जीवन जगायचं असेल, त्यांनी आपल्यापुढचा विषवृक्ष तोडायलाही हवा आणि त्याच्या जागी नव्यानं अमृतवृक्ष लावायलाही हवा. विषवृक्ष न तोडताच अमृतवृक्ष लावला, तर त्या अमृतवृक्षावर विषवृक्षाची अपायकारक सावली पडणारच. याउलट, अमृतवृक्ष न लावताच विषवृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्या विषवृक्षाला पुनःपुन्हा विषमय धुमारे फुटणारच !

 

Additional information

Weight 0.90 kg
Pages

72

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात/ Shambhar Koti Mendu, Donashe Koti Hat”