Description
माझ्या या लेखनावरून कोणी असे समजू नये, की मी भाषेला बंदिस्त करण्याचा दुराग्रह धरत आहे. वस्तुस्थिती अगदी उलट आहे. किंबहुना, भाषेला बंदिस्त करता येतच नाही, असे माझे मत आहे. कोणी कितीही अट्टहास धरला, तरी भाषेचा प्रवाह अशा कोणालाही अजिबात जुमानत नाही. भाषा हा एक वाहता निर्झर आहे. त्याच्या प्रवाहाचे पात्र कमीजास्त प्रमाणात सतत बदलत जाते, बदलत जायला हवे.
अर्थात, भाषेचा व्यवहार पाहणारे जे कोणी असतात, त्यांनी नियमांमध्ये कालानुरूप बदल करून त्या बदलांना प्रमाणभाषेत मान्यता देण्याची गरज असते. समाजानेही अशा प्रकारची मागणी लावून धरण्याची गरज असते. असे असले, तरी जोपर्यंत नियमांमध्ये अधिकृतपणे बदल केले जात नाहीत, तोपर्यंत त्यांचे पालन करणे उचित ठरते.




Reviews
There are no reviews yet.