Description
कालामांनो, एखादी गोष्ट अनुश्रवावरून म्हणजे ऐकीव माहितीवरून स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणी तरी असे असे सांगितले आहे, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे, एवढ्यावरून स्वीकारू नका. (अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या) तर्काच्या वा न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. बाह्य रूपाचा विचार करून स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो, म्हणून स्वीकारू नका (किंवा, एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे, म्हणून स्वीकारू नका). (सांगणाराचे) सुंदर रूप पाहून स्वीकारू नका (किंवा, संभाव्यता आहे एवढ्यावरून स्वीकारू नका). हा श्रमण आपला गुरू आहे, असा विचार करून स्वीकारू नका. कालामांनो, तुम्ही जेव्हा स्वतः होऊनच हा अनुभव घ्याल, की या गोष्टी अकुशल (अहिताच्या) आहेत, या गोष्टी सदोष आहेत, या गोष्टींची जाणकारांनी निंदा केलेली आहे, या गोष्टी घेतल्या असता वा स्वीकारल्या असता अहिताला आणि दुःखाला कारणीभूत होतात, तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा..
…..कालामांनो, जेव्हा तुम्ही स्वतः हूनच असा अनुभव घ्याल, की या गोष्टी हितकारक आहेत, या गोष्टी निर्दोष आहेत, या गोष्टींची जाणकारांनी प्रशंसा केली आहे. या गोष्टी घेतल्या असता वा स्वीकारल्या असता हिताला व सुखाला कारणीभूत होतात, तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या स्वीकारा आणि त्यांना अनुसरून आचरण करा.






Reviews
There are no reviews yet.