Description
छ. शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कर्तबगारीने स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य उभारणीच्या या कार्यात महाराजांनी सर्वसामान्य जनतेतील साहसी व पराक्रमी लोकांना सहभागी करून घेतले. या लोकांच्यातूनच पराक्रमी व शूर योद्धे तयार झाले. स्वराज्याचे हे कार्य सुरू असतानाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेनानी तयार झाले. त्यातूनच महाराजांनी पराक्रमी व्यक्तींची सेनापतिपदी नियुक्ती केली.
छ. शिवाजी महाराजांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते व पायदळाचे प्रमुख येसाजी कंक यांसारख्या वीरांनी सेनापतिपद भूषविले. या सर्व सेनापतींचे स्वराज्य उभारणीत फार मोठे योगदान आहे.






Reviews
There are no reviews yet.