Description
एक फूल उमलले, तर ते किती जणांना सुगंध देते ! त्याच्या पाकळ्या दाही दिशांतील लोकांना आकृष्ट करतात, आनंद देतात. ते एक फूल परिसरातील किती वातावरण प्रसन्नतेने भरून आणि भारावून टाकते. छोटेसे फूल, सृष्टीची इवलीशी निर्मिती – पण केवढी किमया ! केवढी जादूगिरी !
फुलाच्या तुलनेत माणूस किती तरी विकसित, किती तरी उन्नत, किती तरी समृद्ध. मग असा माणूस पुरपूर उमलला, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगध किती तरी दूरपर्यंत दरवळत राहील, किती तरी हृदयांना अत्तराचा स्पर्श देईल, किती तरी मस्तकांना उमदेपणाच्या प्रेरणा देईल.
पण एक गोष्ट स्पष्ट आहे. द्वेषाचे आणि हिंसेचे निळारे पेरून या देशात सुखशांतीची फुले फुलवता येणार नाहीत, माणसे प्रसन्नपणाने उमलविता येणार नाहीत. कुऱ्हाडीच्या घावाने फूलही उमलू शकत नाही आणि तिच्या धाकाने माणूसही उमलू शकत नाही.
जेधे सूड उगवतो तेथे माणूस मावळतो !
जेधे सूड मरतो तेथे माणूस जन्म घेतो !! आणि आपल्याला ‘माणूस’ मावळू द्यायचा नाही, मरू द्यायचा नाही !






Reviews
There are no reviews yet.