Description
आधुनिक युगात मानवाची जसजशी प्रगती होत चालली आहे, तस तशी मानवाची ‘हाव’ वाढत चालली आहे. परिणामी, माणूस बेचैन झाला आहे. त्यातून वैफल्य, नैराश्य, चिडचिड यामुळे माणसाची झोप उडत चाललेली आहे. साहजिकच मनोविकार तज्ञांचे दवाखाने हाउसफुल्ल होत आहेत. हे सर्व का होत आहे? हे सर्व मनाचे खेळ आहेत. मनाच्या संदर्भात अनेक संत, महात्म्यांनी आपणास योग्य मार्गदर्शन केलेले आहे. संत तुकाराम महाराजांनी तर अशा मनाने बेचैन झालेल्या समाजाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी अनेक अभंगांची रचना केलेली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून संत तुकोबांचे मनाच्या संदर्भातील विचार आपणापर्यंत पोहचवण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.






Reviews
There are no reviews yet.