Description
स्त्रिया अनृत असतात, असा धोशा युधिष्ठिराने म्हणजेच त्याच्या तोंडी प्रश्न घालणाऱ्या महाभारतकारांनी सतत लावलेला आहे. स्त्रिया अनृत म्हणजे स्वैराचारी वगैरे असतात, असे म्हणायचे आहे. ‘सहधर्म’ हा शब्द पति-पत्नी यांची एकमेकांवरची निष्ठा, एकमेकांच्या साहचर्यातून निर्माण झालेली त्यांची परस्परप्रीती, त्यांनी केलेले एकमेकांविषयीच्या कर्तव्याचे पालन इ. गोष्टी सुचवतो.
स्त्रिया जर स्वैराचारी असतील, तर त्यांच्या हातून सहधर्माचे पालन होणे शक्य नाही, असे युधिष्ठिराला वाटते. त्याने दिलेले हे कारण पूर्वग्रहदूषित आहे, हे उघडच आहे.
महाभारतात पुन:पुन्हा भर घालणाऱ्या कथाकारांनी आपली मते, आपले तत्त्वज्ञान, आपली जीवनमूल्ये आणि आपले हितसंबंधही थेट स्वत:च्या तोंडून मांडण्याऐवजी या बिचाऱ्या दोन प्रभावी पुरुषांच्या तोंडून वदवले आहेत !






Reviews
There are no reviews yet.