हृदयातून हृदयांकडे/ Hrudayaatun Hrudayaankade

250.00

संत तुकारामांनी व्यक्तिगत जीवनाच्या शुद्धीकरणासाठी एक अतिशय उदात्त विचार मांडला आहे. एका अभंगात ते म्हणतात, “बैसोनी निवांत । शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ।।” आपल्यापैकी प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनाला तर हे सूत्र मार्गदर्शक आहेच; आपण अंतर्मुख होऊन, आत्मनिरीक्षण करून आपल्या आत असलेल्या एकेका दोषाचं उच्चाटन केलं असता, आपल्या जीवनाचं शुद्धीकरण होतं, हे खरंच आहे. परंतु आज संत तुकारामांचा हा उपदेश आपल्या सामाजिक जीवनालाही लागू करण्याची गरज आहे. आपण एकत्र बसू या. आपल्या समाजव्यवस्थेत कोणकोणतं तण आहे ते पाहून शांतपणानं ते उपटून टाकू या, समाजव्यवस्थेतील एक-एक दोष दूर करू या आणि या व्यवस्थेला शुद्ध बनवू या, विशुद्ध बनवू या.

Pages: 184

Description

हे जग तुमच्यामुळं अधिक सुंदर व प्रकाशमय होवो

आपण शरीरानं म्हणा वा कलावंत म्हणून म्हणा, जेव्हा जन्माला आलो, तेव्हा जग जसं होतं, त्यापेक्षा कणभर का होईना, क्षणभर का होईना ते अधिक सुंदर, मधुर आणि आनंदमय बनविण्यात आपण यशस्वी झालो, तर माणूस म्हणूनही आणि कलावंत म्हणूनही आपल्या आयुष्याचं चीज झालं, असं मी मानतो. हे आपल्या हातून घडलंच नाही, तर निदान आपण ते अधिक कुरूप, बेचव आणि दुःखमय केलं नाही, एवढं समाधान आपल्या गाठीला असलं, तरी खूप झालं, असंही मला वाटतं. तुम्हा सर्वांकडून मात्र माझ्या अधिक अपेक्षा आहेत. तुमच्या कलाकृतींनी हे जग अधिक सुंदर तर होवोच, पण ते अधिक प्रकाशमयही होवो, अशी माझी अपेक्षा आहे.

एकत्र बसून समाजव्यवस्थेतलं तण काढू या !

संत तुकारामांनी व्यक्तिगत जीवनाच्या शुद्धीकरणासाठी एक अतिशय उदात्त विचार मांडला आहे. एका अभंगात ते म्हणतात, “बैसोनी निवांत । शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ।।” आपल्यापैकी प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनाला तर हे सूत्र मार्गदर्शक आहेच; आपण अंतर्मुख होऊन, आत्मनिरीक्षण करून आपल्या आत असलेल्या एकेका दोषाचं उच्चाटन केलं असता, आपल्या जीवनाचं शुद्धीकरण होतं, हे खरंच आहे. परंतु आज संत तुकारामांचा हा उपदेश आपल्या सामाजिक जीवनालाही लागू करण्याची गरज आहे. आपण एकत्र बसू या. आपल्या समाजव्यवस्थेत कोणकोणतं तण आहे ते पाहून शांतपणानं ते उपटून टाकू या, समाजव्यवस्थेतील एक-एक दोष दूर करू या आणि या व्यवस्थेला शुद्ध बनवू या, विशुद्ध बनवू या.

Additional information

Weight 210 kg
Pages

184

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हृदयातून हृदयांकडे/ Hrudayaatun Hrudayaankade”