Description
जीवन ही या विश्वातली किती सुंदर घटना आहे ! हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती मंगल आणि पवित्र घटक आहे ! या जीवनाला आधार देणारं आपल्या शरीराचं हे इवलंसं घरटं हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे! त्या घरट्याचा भाग असलेलं निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे!
हे सुंदर जीवन निरामय आनंदानं ओतप्रोत भरून टाकावं… आपला हा आनंद आपल्यापुरता मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांमधे तो वाटून टाकावा.






Reviews
There are no reviews yet.