Description
आपण एकटे सगळ्या जगातील शोषण दूर करू शकत नाही, या आपल्या मर्यादेचे भान कवीने बाळगले आहे, ही फार समाधानाची बाब आहे. शब्दांचे असंख्य बुडबुडे निर्माण करायचे, पण कृती मात्र काहीच नाही, असा पोकळपणा खूपदा आढळतो. कवीने मात्र वास्तववादी भूमिका घेतली आहे. तो म्हणतो,
“जगातील सगळा अंधार दूर करेन, असा माझा दावा नाही जगण्याचे स्वप्न विझू नये, एवढीच माझी इच्छा!”
मला वाटते, आपण सर्वांनीच ही इच्छा बाळगायला हवी.
आपल्या कोणत्याही भावंडाचे जगण्याचे विझू नये, यासाठी आपण दोन पावले टाकण्याची धडपड केली, तरी आयुष्याचे चीज होते, यात शंका नाही.
प्रशांत गायकवाड यांच्या या कविता माझ्या मनाला तृप्त करून गेल्या. फुले-शाहू-आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याची प्रेरणा देऊन गेल्या. तथागतांच्या अधिक जवळ घेऊन गेल्या. धम्माचा स्पर्श घडवून गेल्या. आपल्याही बाबतीत असेच काहीतरी घडेल, असा विश्वास आहे.
डॉ.आ.ह.साळुंखे






Reviews
There are no reviews yet.