चिंतन बळीराजा ते रवीन्द्रनाथ / Chintan Baliraja Te Ravindranath

80.00

भारतीय संस्कृतीमधील विविध व्यक्ती, घटना, तत्वज्ञान इत्यादींचे दाखले देत देत भारतीय संस्कृतीचा एक विधायक, निकोप प्रवाह संक्षेपानं वाचकांच्या पुढं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. हे त्या प्रवाहाचं सर्वसमावेशक रूप नव्हे. त्या प्रवाहाच्या काही घटकांचा केवळ नमुना म्हणून किंवा दिशा दाखविण्यापुरता म्हणून उल्लेख केलेला आहे. हे लेखन प्रामुख्यानं तरुणवर्गासाठी आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील काही उमेद घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला पोषक ठरू शकतील, या भावनेनं ते त्यांच्यापुढं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

Pages: 64

Description

भारतीय संस्कृतीचा एक प्रवाह विषमतेचा, अन्यायाचा पुरस्कार करणारा असला, तरी दुसऱ्या बाजूनं या प्रवाहाच्या विरोधात जाऊन मानवतावादी समाजव्यवस्था निर्माण करू पाहणारा दुसरा एक प्रसन्न प्रवाह देखील येथे पूर्वीपासून आजतागायत अस्तित्वात आहे. विविध व्यक्ती, घटना, तत्त्वज्ञाने, कथा इत्यादींचे दाखले देत देत भारतीय संस्कृतीचा हा विधायक प्रवाह संक्षेपानं वाचकांच्या पुढं ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक होय. हे त्या प्रवाहाचं समग्र व सर्वसमावेशक रूप नव्हे. त्या प्रवाहाच्या काही घटकांचा केवळ नमुना म्हणून किंवा दिशा दाखविण्यापुरता म्हणून इथं उल्लेख केलेला आहे. हे लेखन प्रामुख्यानं तरुणांसाठी आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील काही उमदे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला पोषक ठरू शकतील आणि त्यांना स्वतःचा निकोप वारसा म्हणून स्वीकारावेसे वाटतील, या भावनेनं ते त्यांच्यापुढं  ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

Additional information

Weight 0.90 kg
Pages

64

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिंतन बळीराजा ते रवीन्द्रनाथ / Chintan Baliraja Te Ravindranath”