बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र) / Buddhanchya Sanskarksham Goshti (Illustrated)

80.00

लहानपणी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी समाजमन घडवितात, सुसंस्कारित करतात. बालवयात मनावर होणारे संस्कार किती श्रेष्ठ दर्जाचे परिवर्तन करू शकतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अशाच पद्धतीने आपल्या आजच्या पिढीला बालवयात बुद्धविचारांची ओळख झाली, तर त्यांचे जीवन नक्कीच प्रकाशमान होईल. बुद्धांचे विचार बालमनावर कोरण्यात माझ्या या संपादनाचा थोडा जरी उपयोग झाला, तरी मला अपार आनंद होईल.

Pages: 56

Description

भारतीय लोकांचा बुद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोण तितकासा स्वच्छ नाही. बुद्ध म्हणजे आपले अहित करणारा, किंबहुना आपला शत्रू, अशी भावना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे बुद्ध नेमके कोण? त्यांनी कोणते विचार मांडले? आपल्यासाठी काय केले, हे जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न देखील करत नाही. अनेकांसाठी बुद्ध म्हणजे कुठल्यातरी धर्माचे प्रवर्तक इतकी जुजबी माहिती पुरेशी असते. त्यामुळे ते बुद्धांना परकं समजतात. काहींना बुद्ध हे ईश्वराचा अवतार वाटतात. त्यामुळे त्यांचे विचार समजून घेणे, त्यांच्या विचारांची चिकित्सा करणे, इत्यादींपासून ते स्वतःला दूरच ठेवतात. खरंतर बुद्ध म्हणजे आपल्या अंतःशक्ती फुलविण्याची प्रेरणा देणारा, सर्वांवर करुणेचा वर्षाव करणारा एक प्रेरक मार्गदाता होय.

Additional information

Weight 0.70 kg
Pages

56

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र) / Buddhanchya Sanskarksham Goshti (Illustrated)”