बालसंगोपन शिक्षण आणि संस्कार/ Balsangopan Shikshan Aani Sanskaar

350.00

मुलं आपोआप घडत नसतात, तर त्यांना प्रयत्नपूर्वक घडवावं लागतं. छत्रपती शिवरायांनासुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीराजे यांनी प्रयत्नपूर्वक घडविलं होतं. त्यांच्यासाठी विविध क्षेत्रातील पारंगत प्रशिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांना महाराष्ट्रात पाठवताना त्यांच्यासोबत राष्ट्रमाता जिजाऊ व विशिष्ट असे प्रशिक्षक, निवडक व विश्वासू मंत्री पाठविले होते. तसेच शस्त्रे व खजिना पाठविला होता. छत्रपती शिवरायांना संपूर्ण ‘सनय’ बनवून महाराष्ट्रात जहागिरीवर पाठविले होते. म्हणून शिवबा छत्रपती झाले.

पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपले आचरण केले व तसे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा प्रयत्न केला, तर आपली मुलं घडणारच. मुलं घडणं किंवा बिघडणं सर्वस्वी आईवडिलांवर अवलंबून असतं. मुलं घडली तर त्याचं श्रेय आईवडिलांनाच मिळेल व बिघडली तरी त्याचं पातक हेसुद्धा आईवडिलांचेच असेल, इतकं मात्र निश्चित.

Pages: 224

Description

‘बालसंगोपन शिक्षण आणि संस्कार’ हे पुस्तक लिहिताना खालील गोष्टी विचारात घेतल्या आहेत.

१) मुलांचे घडणे किंवा बिघडणे सर्वस्वी आईवडील व समाजावर अवलंबून आहे, नव्हे तेच त्याला जबाबदार असतात.

२) आईवडील बालकांवर गर्भावस्थेपासून ते मुलांच्या वयाच्या बारा-तेरा वर्षांपर्यंतच संस्कार करू शकतात. त्या वयानंतर मुलं आईवडिलांचा सल्ला ऐकण्याऐवजी मित्रांचा सल्ला ऐकणं पसंत करतात.

३) मुलांच्या हुशारीचा आणि जात, धर्म व वंशाचा काहीही संबंध नसतो. तसे असते तर आधुनिक काळात अस्पृश्य जातीत जन्मलेले डॉ. बाबासाहेबांएवढे मोठे व्यक्तिमत्त्व घडले नसते. बाळाला गर्भाशयात असल्यापासून त्याच्या वयाच्या चौदा वर्षापर्यंत जसे बालसंगोपन, संस्कार आणि शिक्षण झाले, त्याप्रमाणे त्या बालकाची जडणघडण झालेली असते.

४) जन्मतः मुलं मातीचा गोळा असतो असे मानले जाते. त्या मातीच्या गोळ्याला आकार देणारा कारागीर किती कौशल्याने त्या कलाकृतीवर संस्कार करतो त्यावर त्या कलाकृतीचं भवितव्य अवलंबून असते, तोच न्याय बालकांच्या जडणघडणीला लागू पडतो.

५) मुलांना खेळ व छंद जोपासण्यासंबंधी आईवडिलांची काय भूमिका घेतात ?

इ. गोष्टी महत्त्वाच्या असतात.

हे व इतर बरेच काही विषय विचारात घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. मानवाच्या जीवनातील आद्य कर्तव्य म्हणजे बालसंगोपन, शिक्षण आणि संस्कार. त्यामुळे मीसुद्धा या पुस्तकाचे लेखन करताना तेवढाच गांभीर्याने विचार केला आहे.

Additional information

Weight 0.250 kg
Pages

224

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बालसंगोपन शिक्षण आणि संस्कार/ Balsangopan Shikshan Aani Sanskaar”