बहुजनांची जीवनवादी सुभाषिते/ Bahujanaansathi Jeevanvadi Subhaashite

150.00

बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते

आपल्या मुलामुलींची वाणी उत्तम व्हावी असे वाटत असेल, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण

प्रसन्न व आशावादी असावा अशी इच्छा असेल, त्यांनी प्रयत्नवादी व्हावे अशी भावना असेल आणि त्यांचे समग्र जीवन निकोप आनंदाने भरून जावे अशी आकांक्षा असेल, तर आपल्या मुलामुलींकडून ही ५२ सुभाषिते अवश्य पाठ करून घ्यावीत.

त्याबरोबरच, त्यांचा आशय त्यांच्या आचरणात उतरेल, अशा रीतीने तो त्यांच्या मनावर बिंबवावा.

SKU: lokayat0018 Category: Tag: Brand:

Pages: 112

Description

प्रस्तुत पुस्तक हे प्रामुख्याने अशा प्रकारच्या मुलांना डोळ्यांपुढे ठेवून तयार केले आहे. यामध्ये संस्कृत भाषेतील ५२ सुभाषिते घेतली आहेत. मुलांनी दर आठवड्याला एक सुभाषित पाठ केले, तर वर्षभरात हे सर्व पुस्तक त्यांना मुखोद्गत करता येईल. यामुळे त्यांचे शब्दभांडार वाढेल, उच्चार सुधारतील, भाषेविषयीचा आत्मविश्वास वाढेल.

माणसाला इतर प्राण्यांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली करणारे जे काही घटक आहेत, त्यांमध्ये भाषा हा अत्यंत प्रभावी व महत्त्वाचा घटक आहे. ज्या व्यक्तीला भाषेच्या माध्यमातून आपल्या अनुभवांचा आविष्कार अधिक चांगल्या रीतीने करता येतो, त्या व्यक्तीचा विकास इतरांच्या तुलनेत सामान्यत: अधिक प्रमाणात होतो.

विषयाचे आकलन होण्यासाठी जसे भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, तसेच आपले अनुभव, विचार इत्यादी गोष्टी इतरांपर्यंत प्रभावीरीत्या पोचवण्यासाठीदेखील एखादी का होईना भाषा उत्तम रीतीने अवगत असणे आवश्यक आहे.

 

Additional information

Weight 0.130 kg
Pages

112

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बहुजनांची जीवनवादी सुभाषिते/ Bahujanaansathi Jeevanvadi Subhaashite”