Description
मी भाषेच्या संदर्भात वारंवार लिहीत आलो आहे, बोलतही आलो आहे. लहानपणापासूनच भाषांचा अभ्यास, हेच मी माझ्या आयुष्याचे ध्येय मानले होते. शब्दांचे उच्चार, त्यांचे अर्थ, त्यांचे लेखन, त्यांची व्युत्पत्ती, त्यांचे व्याकरण, अशा अनेक बाबींचा शोध घेणे, हा माझा ध्यास होता आणि आहे. स्वाभाविकच, या विषयाच्या संदर्भात मी खूप लेखन केले आहे. माझ्या बहुतेक पुस्तकांमध्ये मी भाषेविषयी काही ना काही लिहिल्याचे आढळेल.
माझे प्रस्तुत लेखनही त्याच प्रवासाचा एक भाग आहे. काही शब्दांच्या बाबतीत मला जे खटकले, ते मी वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही शब्द अभिरुचीच्या दृष्टीने, काही उच्चाराच्या व लेखनाच्या दृष्टीने, काही अंधश्रद्धेच्या दृष्टीने, काही परक्या भाषेतून आपल्या भाषेत स्वीकारण्याच्या संदर्भातील, असे विविध प्रकारचे शब्द मी येथे चर्चेला घेतले आहेत…
….मी या लेखनात शब्दप्रयोगांचा जो विचार केला आहे, तो भाषिक दृष्टीने तर केला आहेच, पण त्याबरोबरच ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक इ. दृष्टींनीही त्यांचा विचार केला आहे.
आणखी एक. भाषेला बंदिस्त करावे, असे माझे म्हणणे मुळीच नाही. उलट, भाषा सदैव परिवर्तनशील, गतिशील आणि प्रवाही असावी, तिने नवे नवे शब्द आणि शब्दप्रयोग आपलेसे करून समृद्ध आणि ताजेतवाने बनावे, हाच माझा आग्रह आहे.




Reviews
There are no reviews yet.