Sale!

विद्रोही तुकाराम/ Vidrohi Tukaram

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

तुकाराम ! मानवी जीवनातील नाना प्रकारच्या उत्कट अनुभवांना अत्यंत आशयघन शब्दांत साकार करणारा एक शब्दार्थप्रभू प्रतिभावंत. धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारा एक आचारशील भक्त. अक्षरशः सर्वस्व पणाला लावून सांस्कृतिक व सामाजिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारा एक आव्हानवीर योद्धा. प्रतिभावंत, भक्त आणि योद्धा या तिन्ही भूमिकांचा एकत्र मिलाफ झालेला महापुरुष – कवी तुकाराम, संत तुकाराम, विद्रोही तुकाराम !

Pages: 416

Description

पुस्तकाचे नाव: विद्रोही तुकाराम
Book name:vidrohi tukaram
लेखक: डॉ आ.ह.साळुंखे/Dr.A.H.Salunkhe
भाषा: मराठी
प्रकार: चरित्र / विचार साहित्य
पृष्ठसंख्या: 416
किंमत: ₹600
वजन: 0.459 ग्रॅम

विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला, हे पण हा साक्षात्कार आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता, तर सामाजिक न्यायाच्या होता. या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले, ते वडिलांनी दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचे होय. त्यांनी हे कृत्य विटल्यामुळे नव्हे, तर संसाराला चिकटणारा शोषणाचा घटक छाटून केले. अन्नान्न दशा झाल्यामुळे ते ईश्वरभक्तीकडे वळले, हे काही लेखकांचे खरे नव्हे. कारण, मी जनार्दनाकडे आलो, ते काही अन्नाला महाग झालो होतो असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मी वेदांचा अंकित नाही. भेदभाव वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो, सर्वांच्या ठिकाणी समत्व ब्रह्माचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय, अशी भूमिका त्यांनी घेतली. व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा, वाण्याच्या गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे, गावाचा हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय, त्यांनी विचारले. महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही ज्ञानी ब्राह्मण नव्हे, त्याने देहान्त प्रायश्चित्त घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही, म्हटले.
सोवळ्या-ओवळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या आणि जो परद्रव्य व परनारी बाबतीत सोवळा असतो तोच खरा सोवळा, अशी नैतिक कसोटी सांगितली. जो शेंडी यांच्याबरोबरचा संबंध तोडेल, त्याला कसलीही बाधा होणार नाही, असे वेधिनिषेध, यज्ञ, श्राद्ध, पूजा, भविष्यकथन, शुभाशुभ, नवस, कौल, योग, उपवास, तीर्थयात्रा, वनवास, गुहेतील ज्ञान, संन्यास, मोक्ष यांचे परंपरागत कारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्त्व असल्याचे त्यांचा ईश्वरही पारलौकिक मूल्यांवर नव्हे, तर माणूसकीवर आधारलेला होता. गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो, तो खरा साधू आणि देव अशा राहतो, असे त्यांनी म्हटले. देवपूजा करताना असे संत घरी आले असता जूला सारून या संतांची पूजा करावी, असे त्यांनी लोकांना सांगितले.

म्हणजे समाजव्यवस्थेला न्यायाचे अधिष्ठान देऊन तिचे निर्मलीकरण त्यांनी रात्रंदिवस युद्ध केले आणि काही तत्त्वांसाठी, काही मूल्यांसाठी हातांनी एका प्रबळ समाजाच्या वैराचा ज्वालामुखी उरावर ओढवून घेतला

Additional information

Pages

416

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विद्रोही तुकाराम/ Vidrohi Tukaram”