Description
धर्मसूत्रे हे वैदिक ब्राह्मणांचे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होत. ते वैदिकांनी भ्रष्ट केलेल्या पुराणांसारखे चिल्लर वा थिल्लर ग्रंथ नव्हेत. एकीकडून त्यांच्यामध्ये ‘ब्राह्मण’ नावाच्या ग्रंथांचे सार आले आहे, तर दुसरीकडून मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांमध्ये त्यांचा अर्क उतरला आहे. हे ग्रंथ म्हणजे एकीकडून ब्राह्मणग्रंथांची विषसंतती आहे, तर दुसरीकडून ते मनुस्मृतीसारख्या ग्रंथांचे कृटिल आईबाप आहेत. वैदिकांचे आचार-विचार, रूढी, प्रथा, कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने या ग्रंथांचे स्थान फार वरचे आहे. वैदिकांचा अहंकार, त्यांचा श्रेष्ठत्वाचा गंड, त्यांची अमानुष क्रूरता, त्यांच्या मनाचा हलकेपणा, त्यांची असंस्कृत वृत्ती इ. दुर्गुणांचे दर्शन या ग्रंथांमधून अगदी लख्खपणे घडते. ज्यांना भारताचा खराखुरा समाजशास्त्रीय इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्यांनी हे ग्रंथ जरूर नजरेखालून घातले पाहिजे.






Reviews
There are no reviews yet.