वादांची वादळे/ Vadanchi Vadale

220.00

तसे बघितले, तर वाद घालणे हा माझा स्वभाव नाही. संघर्षापासून चार हात दूर राहून शांतपणे, प्रसन्नपणे जीवनाचा आस्वाद घ्यावा, हाच माझा खरा पिंड आहे. आज मी रुक्ष आणि किचकट अशा वादात अडकलेलो दिसत असलो, तरी मूलतः ललित कला, गणित, पाणिनीच्या व्याकरणातील सूक्ष्मातिसूक्ष्म प्रतिभा, निसर्गसौंदर्य, निवडक व्यक्तींच्या सहवासातील आनंद अशा गोष्टींमध्ये तल्लीन होऊन जाणे, हाच माझ्या चित्तवृत्तीचा गुणधर्म होता आणि आजही आहे. संघर्षात उतरणाऱ्या माणसाला हे सगळे बऱ्याच प्रमाणात गमवावे लागते आणि त्याला त्याचे आपल्या हृदयाचा लचका तोडल्यासारखे दुःख होते, यात शंका नाही.

डॉ. आ.ह.साळुंखे

Pages: 232

Description

पायात पुसणारे काटे आम्ही काढायचे नाहीत काय ?

गोष्ट साधी सरळ आहे; आम्हांला स्वतंत्र माणूस म्हणून जगायचे आहे. आम्हांला कुणाशी भांडण करण्याची वा वाद घालण्याची हौस नाही. आम्ही स्वतः हुन कुणाच्या वाटेला जाऊ इच्छीत नाही. आम्हांला आपले आमच्याच वाटेने जायचे आहे. आता, आमच्या या वाटेवर जेव्हा काटेकुटे आढळतात, तेव्हा ते बोचू नयेत म्हणून, आमच्या पायात घुसू नयेत म्हणून, ते बाजूला करणे भागच आहे. रस्त्यात जेव्हा काही दगडधोंडे येतात, तेव्हा ठेच लागू नये म्हणून ते दगडधोंडे बाजूला करावेच लागतात. वाटेत खाचखळगे आले, तर पाय खड्ड्यात जाऊन तोंडावर आपटण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून ते खाचखळगे बुजवावेच लागतात. आम्ही एवढेही करू नये, असे ज्यांना वाटते, त्यांनी आमच्याबरोबर भांडण उकरून काढले, तर आम्ही काय करावे? ते म्हणतील, की आम्ही गप्प बसावे, किंवा पळून जावे. आम्ही म्हणतो की आता आम्ही असे करणार नाही. आता आम्ही प्रतिहल्ला चढवू !

प्रश्न आहे आमच्या स्वातंत्र्याचा

आम्ही स्वतंत्र माणूस म्हणून जगणार, याचा अर्थ आम्ही इतरांकडून काही घेणारच नाही अथवा इतरांचे सर्व काही नाकारणार, असे मुळीच नाही. आमच्या भावविश्वामध्ये जगातील सर्व गोष्टींना प्रवेश असेल. मुद्दा एवढाच आहे, की या गोष्टींमधून काय घ्यायचे आणि काय घ्यायचे नाही, याचा निर्णय मात्र आम्ही स्वतःच करू. जे घ्यायचे ते आम्ही वेचून, निवडून घेऊ. त्याला आमच्या अगदी ‘स्व’ चा भाग बनवून टाकू. परंतु निवड करण्याचा अधिकार आम्ही दुसऱ्या कोणाला देणार नाही. त्यांच्या स्वतःच्या जीवनासाठी त्यांना जे हिताचे आणि आनंदाचे वाटत असेल, ते निवडण्याचा त्यांचा अधिकार जर आम्ही त्यांच्याकडून हिरावून घेत नाही, तर आमच्या बाबतीत तो अधिकार आपल्या हाती घेण्याचा अट्टहास त्यांनी तरी का बाळगावा ? पुन्हा एकदा स्पष्ट करतो, की गोष्ट साधी, सरळ आहे. प्रश्न आहे आमच्या स्वातंत्र्याचा. या प्रश्नावर त्यांचे उत्तर काय आहे, यावर आमचे प्रत्युत्तर अवलंबून आहे!

Additional information

Weight 0.260 kg
Pages

232

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वादांची वादळे/ Vadanchi Vadale”