स्वराज्यमाता जिजाऊ (संक्षिप्त आवृत्ती)/ Swaraajyamaataa Jijaau (Abridged Edition)

40.00

जिजाऊंची प्रेरणा घेऊन शिवछत्रपतींनी फक्त एका राज्याचाच पाया घातला असे नाही तर त्यांनी एका राष्ट्राचीच स्थापना केली होती. एखादे राष्ट्र स्त्रीच्या प्रेरणेतून उभे राहते असे उदाहरण दुर्मिळ. जिजाऊंची प्रेरणा फक्त इतिहासातच राहिली नाही तर इतिहासाच्या वर्तुळाबाहेर येऊन या जिजाऊ प्रेरणेने वर्तमानालाही आपल्या कवेत घेतले आहे.

SKU: lokayat0102 Category: Tag: Brand:

Pages: 24

Description

अशक्य कोटीतील स्वप्न म्हणजे ‘स्वराज्य’ हे छत्रपती शिवाजी महाराजांकरवी जिजाऊंनी वास्तवात आणले. जिजाऊंनी आपल्या कुशल व प्रभावी मार्गदर्शनाने महाराजांच्या जन्मजात अशा सर्व गुणांना योग्य तो आकार देऊन, मार्गदर्शन करून शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न वास्तवात आणले. या वास्तवाच भान असलेल्या विचारातूनच आज ‘जय जिजाऊ ! जय शिवराय !’ ही घोषणा उदयास आल्याचे दिसते.

शिवराय केवळ पन्नास वर्षेच जगले. पण एवढ्या अल्पावधित जगातील अद्वितीय असे कार्य त्यांनी केली. युगानुयुगे अभिमान वाटावा असे हे कार्य आहे. या पन्नास वर्षांपैकी जवळपास पंचेचाळीस वर्षे त्यांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक संकटात जिजाऊंच्या अमूल्य अशा मार्गदर्शनाची व प्रत्यक्ष कृतीची त्यांना मदतच झाली. याचे श्रेय इतरांना लाटता येणार नाही, ते जिजांऊकडेच जाते.

Additional information

Weight 0.40 kg
Pages

24

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराज्यमाता जिजाऊ (संक्षिप्त आवृत्ती)/ Swaraajyamaataa Jijaau (Abridged Edition)”