श्रद्धांजली आणि गौरवांजली/Shraddhanjali Aani Gouravanjali

80.00

जीवनाच्या या प्रवासात एक गोष्ट मात्र आनंदाची असते. काही आदरणीय, सन्मान्य, प्रिय व्यक्ती मध्येच आपल्याला सोडून गेल्या, तरी काही महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या सोबत असतातच. मी प्रस्तुत पुस्तकात ज्याप्रमाणे निघून गेलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली आहे, त्याप्रमाणेच जे लोक आपल्याला प्रेरणा द्यायला, प्रोत्साहन द्यायला, बळ द्यायला, कौतुक करायला, मैत्री करायला आणि आनंद द्यायला अजूनही आपल्या सोबत असतात, त्यांच्याविषयी गौरव हा वाटतोच. मी प्रस्तुत पुस्तकात माझ्या जीवनातील अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींना गौरवांजली अर्पण केली आहे.

SKU: lokayat0059 Category: Tag: Brand:

Pages: 56

Description

जन्माला आल्यापासून आपल्या आयुष्याचा अखंड प्रवास चालू असतो. या प्रवासात बरीवाईट असंख्य वळणे येतात. प्रत्येक वळणावर कोणी तरी नवीन भेटते. आपल्या जीवनात काही ना काही भर घालते. कोणी चालायला शिकवतात. कोणी बोलायला शिकवतात. कोणी संस्कार देतात, माहिती देतात, ज्ञान देतात. मदत करतात, उपकार करतात, धीर देतात, दिलासा देतात, आधार देतात. स्नेह देतात, प्रेम देतात, जिव्हाळा देतात, माया देतात. आनंद देतात.

लोक एवढ्याच मार्गांनी आपल्या जीवनात प्रवेश करतात, असे नाही. इतरही अनेक मार्गानी ते आपल्या जगण्याचा भाग बनतात. आपल्या जगण्याला दिशा देतात, जीवनाला खरा अर्थ मिळवून देतात. आपले मार्गदर्शक बनतात, सोबती बनतात, साथीदार बनतात.

नुसता श्वासोच्छ्‌वास चालू ठेवणे म्हणजे खरे जगणे नव्हे, नुसती तहान-भूक भागवत राहणे म्हणजे खरे जगणे नव्हे, या लोकांच्या आधाराने, मदतीने आणि मुख्य म्हणजे सोबतीने चालत राहणे म्हणजे जगणे होय. कारण, हाच तर आपला जिवाभावाचा गोतावळा असतो !

 

Additional information

Weight 0.80 kg
Pages

56

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रद्धांजली आणि गौरवांजली/Shraddhanjali Aani Gouravanjali”