Description
राजनीतीच्या अनुषंगाने विचार केला तर ‘नेतृत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला अधिकाधिक वाव मिळतो आणि त्याचा लौकिक वाढण्यासही मदत होते. परंतु, अंगी गुणकौशल्यांची खाण असतानाही केवळ नेतृत्वाची संधी न लाभल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला उपेक्षा येते. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्याबद्दलचा इतिहास हेच सांगतो.
संभाजीराजांना स्वतंत्रपणे नेतृत्व करण्याची संधी फारशी मिळालेली दिसत नाही. अपवाद फक्त शहाजीराजांना कैद झाल्याच्या घटनेचा. मुस्ताफाखानाने शहाजीराजांना कैद केल्यानंतर फर्रादखान हा सरदार संभाजीराजांच्या बेंगलोर नगरीवर चालून आला त्यावेळी प्रथमच संभाजीराजांना नेतृत्वाची धुरा स्वतंत्रपणे सांभाळण्याची संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने करून दाखविले.
दुसरी गोष्ट अशी की, संभाजीराजे यांचे व्यक्तिमत्त्व रणांगणावरील पराक्रमाशिवाय आणखीनच खास होते. विशेष म्हणजे संस्कृतसह विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे आर्दीचा त्यांनी उत्तम अभ्यास केल्यामुळे त्यांचे बौद्धिक कौशल्य हे प्रभावी होते.
अशा या बहुगुणी आणि पराक्रमी संभाजीराजांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून समस्त इतिहासप्रेमींना निश्चितच होईल.






Reviews
There are no reviews yet.