Description
सर्वोत्तम भुमिपुत्र गोतम बुद्ध
बुद्ध कोणी परका नाही. वैरी तर नाहीच नाही. खरे तर तो आपल्याच अंत:शक्तींचे साकार रुप आहे.
आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू, अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे. किंबहुना़, आपण त्याचे अविकसित पूर्वरुप आहोत आणि तो आपले विकसित उत्तररूप आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे
कालामांनो, एखादी गोष्ट अनुश्रवावरून म्हणजे ऐकीव माहितीवरून स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणी तरी असे असे सांगितले आहे, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे, एवढ्यावरून स्वीकारू नका. (अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या) तर्काच्या वा न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. बाह्य रूपाचा विचार करून स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो, म्हणून स्वीकारू नका (किंवा, एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे, म्हणून स्वीकारू नका). (सांगणाराचे) सुंदर रूप पाहून स्वीकारू नका (किंवा, संभाव्यता आहे एवढ्यावरून स्वीकारू नका). हा श्रमण आपला गुरू आहे, असा विचार करून स्वीकारू नका. कालामांनो, तुम्ही जेव्हा स्वतः होऊनच हा अनुभव घ्याल, की या गोष्टी अकुशल (अहिताच्या) आहेत, या गोष्टी सदोष आहेत या गोष्टींची जाणकारांनी निंदा केलेली आहे, या गोष्टी घेतल्या असता वा स्वीकारल्या असता अहिताला आणि दुःखाला कारणीभूत होतात, तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा…
…कालामांनो, जेव्हा तुम्ही स्वतःहूनच असा अनुभव घ्याल, की या गोष्टी हितकारक आहेत, या गोष्टी निर्दोष आहेत, या गोष्टींची जाणकारांनी प्रशंसा केली आहे, या गोष्टी घेतल्या असता वा स्वीकारल्या असता हिताला व सुखाला कारणीभूत होतात, तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या स्वीकारा आणि त्यांना अनुसरून आचरण करा.
मनुष्यत्व धम्माच्या प्रतीकांपेक्षाही अधिक रमणीय
“तथागत मनुष्यत्वाला धम्माच्या महत्त्वपूर्ण प्रतीकांपेक्षाही अधिक मानत होते, याचा पुरावा देणारी एक अत्यंत हृद्य आणि आशयघन गाथा संयुत्तनिकायात आढळते.
ते एकदा श्रावस्तीमध्ये होते. तेव्हा देवांचा राजा शक्क त्यांच्याकडे आला. त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “भन्ते, भूमीची रमणीयता कोणती ?” त्यावर त्यांनी दोन गाथांमध्ये त्याला उत्तर दिले, “आरामचैत्य (उद्यानातील चैत्य), वनचैत्य आणि उत्तम रीतीने निर्माण केलेली पुष्करिणी यांचे मोल मनुष्यरमणीयतेच्या सोळाव्या कलेइतकेही नसते. गाव असो वा अरण्य असो, सखल भाग असो वा सपाट भाग असो, जेथे अरहंत विहार करतात, ती भूमीची रमणीयता होय.”
वस्तुतः, चैत्य हे श्रमणपरंपरेचे आणि विशेषतः बौद्ध परंपरेचे अत्यंत महत्त्वाचे प्रतीक होते. तथागतांच्या परिनिब्बानानंतर सुमारे पाचशे वर्षे त्यांच्या मूर्ती बनत नव्हत्या, त्या काळात बौद्धजनांच्या दृष्टीने चैत्य हे स्वतः तथागतांचे द्योतक असे एक श्रद्धेय प्रतीक होते. पण अशा प्रतीकांपेक्षा मानवी जीवन अनेक पटींनी श्रेष्ठ आहे, असे त्यांनी येथे म्हटले आहे. मनुष्यरमणीयता हा शब्दच किती माधुर्याने ओतप्रोत भरलेला आहे ! अरहंत हे सर्व विकारांच्या पलीकडे गेलेले संत असतात. त्यांचे वास्तव्य जेथे असते, तेथील जमीन ओबड-धोबड असली, तरी देखील अशी स्थाने भूमीवरील सर्वांत रमणीयस्थाने होत, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. मानवाचे आणि त्यातही जितेंद्रिय मानवाचे माहात्म्य सांगणारे हे उद्गार महान भूमिपुत्राला साजेसेच आहेत
Sarvottam Bhumiputra Gotam Buddh
Buddha is not an alien. He is not an enemy at all. In fact, he is the embodiment of our own inner powers.
Buddha is exactly as we appear when we are fully blossomed. In fact, we are his undeveloped previous form and he is our developed later form.
Dr. A. H. Salunkhe
People of time, do not accept something based on hearsay, that is, on hearsay. Do not accept it because it is a tradition. Do not accept it because someone has said something like this. Do not accept something just because it comes from the Pitaka. Do not accept it on the basis of logic or jurisprudence (not supported by experience). Do not accept it by considering the external form. Do not accept it because you enjoy guessing (or, do not accept something because it suits your opinion). Do not accept it because of its beautiful appearance (or, do not accept it because it is probable). Do not accept it thinking that this monk is your teacher. Kalama, when you yourself experience that these things are unwholesome (harmless), these things are defective, these things have been condemned by the wise, these things, when taken or accepted, cause harm and suffering, then Kalama, you should abandon those things…
…Kalama, when you yourself experience that these things are wholesome, these things are blameless, these things have been praised by the wise, these things, when taken or accepted, cause benefit and happiness, then Kalama, you should accept them and act accordingly.
Humanity is More Beautiful Than the Symbols of Dhamma
“There is a very touching and meaningful story in the Samyutta Nikaya that proves that the Tathagata considered humanity to be more than the most important symbols of Dhamma.
Once he was in Sravasti. Then the king of the gods, Shakka, came to him. After greeting him and sitting to one side, he said to him, “Venerable sir, what is the beauty of the earth?” To this he replied in two stories, “The value of the Aramacaitya (the consciousness of the garden), the forest caitya and the well-made Pushkarini is not even equal to the sixteenth art of human beauty. “Whether it is a village or a forest, a lowland or a flatland, where the Arahants reside, it is the beauty of the land.”
In fact, the Chaitya was a very important symbol of the ascetic tradition and especially of the Buddhist tradition. For about five hundred years after the Parinibbana of the Tathagata, his idols were not made, during which time the Chaitya was a revered symbol as a symbol of the Tathagata himself in the eyes of the Buddhists. But human life is many times superior to such symbols, he has said here. How sweet is the word “human beauty”! Arahants are saints who have gone beyond all vices. He has said that wherever they live, even if the land is rough and rugged, such places are the most beautiful places on earth. These words, which speak of the greatness of humans, and especially of humans with all their senses, are fitting for a great son of the earth.






Reviews
There are no reviews yet.