Description
माणसानं आयुष्यात संत तुकारामांचा निदान एक तरी अभंग ऐकावा, म्हणावा आणि अनुभवावा, म्हणजे नीट कसं जगावं आणि आनंदरसामधे भिजून कसं निघावं, हे कळल्याखेरीज रहात नाही. आपल्याकडं आपल्या स्पर्शानं लोखंडाचं सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिसाची एक कल्पना करण्यात आली आहे. ती सत्य असो वा काल्पनिक असो, तिचा व्यंग्यार्थ अतिशय सूचक आहे. आपण इथं तो व्यंग्यार्थ ध्यानात घेऊन तुकारामांच्या अभंगांचा विचार करू या. त्यांचा एक-एक अभंग म्हणजे एक-एक परीस आहे, खराखुरा परीस आहे. आपल्या जीवनाला कोणत्याही मार्गानं त्याचा स्पर्श झाला, तरी त्याचं सोनं झाल्याखेरीज रहात नाही. इथं तर आपल्यासमोर त्यांचे शंभर अभंग आहेत ! त्यांच्या स्पर्शानं आपलं सर्वार्थानं आणि अंतर्बाह्य कल्याण होणार, याची खात्री बाळगू या.






Reviews
There are no reviews yet.