Description
समन्वय
आपल्या समाजामध्ये जे विविध घटक व जनसमूह आहेत, त्या सर्वांमध्ये एक संवाद असावा, त्यांनी संवादाद्वारे एकमेकांना समजून घ्यावे आणि काही मतभेद असले तरी आपल्याप्रमाणेच इतरांचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे, हे मान्य करून त्यांचा आदर करावा, असे मला वाटत असते. व्यक्तीव्यक्तीच्या संबंधातही हेच तत्त्व लागू पडते. सर्वांनी समंजसपणाने आपापसांत एक समन्वय साधावा, एकजूट करावी, ऐक्य बाळगावे, तरच आपला समाज हा एक स्वस्थ, निरोगी, निरामय समाज म्हटला जाईल आणि तो प्रगतीची उंच उंच शिखरेही गाठू शकेल, हा हेतू मनात ठेवून मी नेहमी जगत आलो आहे आणि या पुस्तकामधूनही मी हेच सांगू पहात आहे.
संभाजी महाराज ! अखंड तळपणारा एक मानवी सूर्य ! स्वातंत्र्याच्या आणि स्वीकृत जीवनमूल्यांच्या रक्षणासाठी प्राणांसह सर्वस्वाचा त्याग करण्याची सिद्धता असलेला आणि प्रत्यक्षात तसा त्याग करणारा समर्पणपुरुष! मूर्तिमंत विजिगीषा-जिंकण्याची इच्छा त्यांच्या चरणांवर नतमस्तक होती. साक्षात भीती ज्यांना पाहून भिऊन पलायन करायची, असा निर्भय योद्धा. त्यांच्या अंतर्यामी तिरस्कार होता, तो गुलामगिरीचा, कपटाचा, अन्यायाचा, जुलमी राजवर्टीचा आणि अंगीकार होता, तो स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा, मुक्त मस्तकाचा, जनकल्याणाचा !






Reviews
There are no reviews yet.