पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर/ Purandarenchee Itihaasdrohi Bakhar

290.00

पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर ‘राजा शिवछत्रपति’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी आपल्या या पुस्तकाच्या वेगवेगळ्या आवृत्यांना वेगवेगळ्या नावांची प्रास्ताविके जोडली आहेत.

Pages: 176

Description

पुरंदरे, तुम्ही पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ लोकांना झुलवत ठेवले !

 

पुरंदरेंनी कितीही आव आणला, तरी ते शिवचरित्राकडे स्वच्छ दृष्टीने पाहू शकलेले नाहीत. त्यांनी शिवचरित्र हे आपल्या एका संकुचित उद्दिष्टाचे साधन मानून आपले पुस्तक लिहिले आहे, ही त्यांची सर्वांत मोठी मर्यादा आहे. एका विशिष्ट वर्गातील तरुणांना दुसऱ्या एका वर्गातील लोकांच्या विरोधात पेटून उठण्यास प्रवृत्त करावे, याच हेतूने त्यांनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत एकांगी झाले आहे.

चरित्रनायक शिवाजी महाराज हे जातिधर्मांच्या पलीकडे जाऊन आपल्या अंतःकरणात सर्वांना सामावून घेणारे आणि त्यांचे चरित्र लिहिणारा लेखक मात्र निःसंदिग्धपणे स्वजातिवर्चस्वाच्या भावनेने पुरता पछाडलेला. असा मनुष्य त्या महामानवाच्या चरित्राला न्याय कसा देऊ शकेल बरे ?

पुरंदरे, तुम्ही बहुजन समाजाला खोट्या, बदनामीकारक, कृत्रिम, नकली, बनावट, फसव्या भाषेच्या भपक्याने दीर्घकाळपर्यंत खुलवले, झुलवले आणि भुलवले- पण अस्सल आशयाने फुलवले मात्र नाही ! मानले पाहिजे तुम्हांला : आपल्या जनसमूहाचे वर्चस्व टिकवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या हो तुम्ही 

 

Purandare, you have kept people in suspense for more than fifty years!

No matter how much Purandare pretends, he has not been able to look at the biography of Shiva with a clear eye. He has written his book considering the biography of Shiva as a tool for his narrow purpose; this is his biggest limitation. Since he took up writing the biography of Maharaj with the intention of inciting the youth of a particular class to rise up against the people of another class, his writing has become very one-sided.

The author who wrote the biography of Shivaji Maharaj, the hero of the story, who went beyond caste and religion and embraced everyone in his heart, is undoubtedly obsessed with the feeling of his own caste supremacy. How can such a person do justice to the biography of that great man?

Purandare, you have deceived, deceived, and deceived the Bahujan community for a long time with the blatant use of false, defamatory, artificial, fake, fabricated, and deceptive language—but have not filled it with genuine content! You must admit how much you have suffered to maintain the dominance of your people.

 

Additional information

Weight 0.100 kg
Pages

176

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर/ Purandarenchee Itihaasdrohi Bakhar”