Description
पार्थिव काया गेली, अपार्थिव प्रेरणा जिवंत आहे !
होय, इंग्रजांनी उमाजींना फाशी दिले. त्यांचे नाशवंत शरीर नष्ट केले. त्यांचे शारीरिक अस्तित्व संपुष्टात आणले. त्यांच्या ज्वालासदृश तेजस्वी देहाला मृत्यूने गिळंकृत केले. परंतु हा काही उमाजींच्या क्रांतीचा शेवट नव्हता. तो तर त्या क्रांतीला अधिक ज्वलंत बनवणारा क्षण होता. त्यांची पार्थिव काया जरी नष्ट झाली, तरी त्यांची अपार्थिव प्रेरणा त्या क्षणीही जिवंत होती आणि आजही, आताही जिवंत आहे !
उमाजी उमाजी । आठवण तुझी । हृदयांत ताजी । सकलांच्या ।।
तुझे मनोबळ । जसे की वादळ । झाली तारांबळ । इंग्रजांची ।।
पराभवातही । स्वातंत्र्याची ग्वाही । दिशा आम्हां दाही । सांगतात ।।
तुझे समर्पण । नव्हे साधारण । त्याचे विस्मरण । होणे नाही ।।
असो कोणी अज्ञ । अथवा सर्वज्ञ । सगळे कृतज्ञ । राहतील ।। सगळे कृतज्ञ राहतील !






Reviews
There are no reviews yet.