प्राचीन सातारा (कला-इतिहासाचा ठेवा) / Prachin Satara (Kala-Itihasacha-Theva)

150.00

सातारा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रदेशाच्या प्राचीन वारशाचा एक सखोल, सर्वंकष आणि विचारप्रवर्तक आढावा आहे. सातारा, ज्याला ,मराठा स्वराज्याच्या चौथ्या राजधानीचे गौरवशाली स्थान प्राप्त आहे, हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून भारतीय इतिहास, संस्कृती आणि कलेचा एक जिवंत दस्तऐवज आहे.

Pages: 82

Description

‘सातारा’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती स्वराज्याची चौथी राजधानी. मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासात शिवप्रतापाच्या जाज्वल्य खुणा मिरवणारी ‘अजिंक्य’ भूमी आणि त्याचबरोबर स्वराज्याचं मराठा साम्राज्यात रूपांतर करणारं केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारा हा जिल्हा. अजस्त्र सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या मिरवत कित्येक बुलंद गडकोटांची साक्ष देणारा हा प्रदेश. कृष्णा-कोयना सारख्या नद्यांनी समृद्ध केलेली, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण लाभलेली ही वैभवशाली माती. मात्र या सगळ्याला एक महत्त्वपूर्ण जोड लाभली आहे, ती म्हणजे या भूमीच्या प्राचीनतेची. प्रागैतिहासिक काळापासूनचा इतिहास मिरवणारा हा भूप्रदेश नेमका कसा होता शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ? या भूमीवर नांदलेल्या राजसत्ता, निर्मिलेल्या अद्वितीय वास्तू, तत्कालीन लोकजीवन, संस्कृती, व्यापार अन् इथल्या कलेतिहासाच्या संपन्न ठेव्यात सामावलेल्या इतिहास कथांद्वारे घेतलेला हा मागोवा, म्हणजेच ‘प्राचीन सातारा’।

Additional information

Weight 0.100 kg
Pages

82

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राचीन सातारा (कला-इतिहासाचा ठेवा) / Prachin Satara (Kala-Itihasacha-Theva)”