Description
डॉ. आ.ह.साळुंखे यांची अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील मुलाखत आपल्या हाती देत असताना आम्हांला खूप आनंद होत आहे. इतिहासाचे संशोधन आणि पुनर्लेखन व्हावे. यासाठी झगडणाऱ्या परिवर्तनवादी चळवळीना आ.ह.साळुंखे हे नाव सुपरिचित आहे. संस्कृती, धर्म आणि भाषा या जीवनाच्या विविध क्षेत्रांतील त्यांचा व्यासंग मोठा आहे. गेली कित्येक वर्षे ते अथकपणे बहुजनांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी आपली प्रतिभासंपन्न वाणी आणि लेखणी कामी आणत आहेत. मेणाहून मऊ आणि वज्रालाही भेदण्याइतकी कठीण, अशी वाणी व लेखणी ठेवण्याचा आदर्श त्यांनी संत तुकारामांकडून घेतल्याचे जाणवते.






Reviews
There are no reviews yet.