परिवर्तन : शास्त्रही, कलाही/ Parivartan : Shastrahee, Kalaahee

80.00

जीवनावरचं उत्कट प्रेम, सृष्टीविषयीची अखंड जिज्ञासा, नव्या अनुभवांसाठीची आतुर उत्कंठा जोपर्यंत क्षीण वा नष्ट होत नाही, तोपर्यंत आपल्या अस्तित्वाचं पात्र सदैव माधुर्यान ओथंबलेलंच असतं-आपल्या अस्तित्वातून जीवनाचा प्रवाह अखंड वहातच असतो. आपल्या आतले आनंदाचे झरे कधी आटणार नाहीत, याची खबरदारी मात्र घ्यायला हवी ! शेवटचा श्वासही नवनिर्मितीच्या ध्यासानं झपाटलेला असावा, हे आयुष्याच्या अंताविषयीचं अतिशय कोवळं आणि सुंदर स्वप्न होय! हे स्वप्न आपण आपल्या हळुवारपणानं जरूर जपायला हवं- कायमचं जपायला हवं !

SKU: lokayat0036 Category: Tags: , Brand:

Pages: 56

Description

गणितशास्त्र, मानसशास्त्र इत्यादीसारखी कोणतीही ज्ञानशाखा घेतली, तरी तिचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावंच लागतं. नेमके तेच परिवर्तनशास्त्राच्या बाबतीतही आहे. स्वतः शिकून घेतल्याशिवाय कोणीही या शास्त्रांमधलं काहीही दुसऱ्याला शिकवू शकणार नाही. संस्कृती, नीती, इतिहास, धर्म, सण, उत्सव, देवता इत्यादींच्या बाबतीत गांभीर्यानं अध्ययन केल्याशिवाय कुणालाही त्या क्षेत्रांत निर्दोष परिवर्तन घडवता येणार नाही.

खरं तर, परिवर्तनाच्या प्रक्रियेत काम करणारांच्या व्यक्तिमत्त्वांत शास्त्र आणि कला यांचा एकात्म असा समन्वय व्हायला पाहिजे, त्यांची एक रेशमी गुंफण व्हायला पाहिजे. आणि जसं शास्त्राचं शिक्षण घेतलं पाहिजे, तसंच कलेचंही शिक्षण घेतलं पाहिजे. निदान अंतःस्फूर्तीनं का असेना, जाणीवपूर्वक स्वतःची स्वतः काही तपश्चर्या तरी करायलाच हवी ।

Additional information

Weight 0.70 kg
Pages

56

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परिवर्तन : शास्त्रही, कलाही/ Parivartan : Shastrahee, Kalaahee”