परिवर्तन : हिंसेविना/ Parivartan : Hinsevinaa

70.00

मानवी हिताचे विचार आणि अशा विचारांना विघातक असणाऱ्या अंधश्रद्धा यांचं नातं धान्य देणारं पीक आणि पिकाला मारू पाहणारं तण यांच्यासारखचं असतं. अशा स्थितीत शेतकरी जे करतो, तेच करणं हे आपलं कर्तव्य आहे. शेतकरी पिकाची जपणूक करतो, त्याची काळजी घेतो. त्याला तणापासून वाचवण्यासाठी भांगलण, कोळपण यांसारखी कामं करून तणाचा नायनाट करायचा आणि पिकाचं पुरेपूर जतन करायचं, ही त्याची अखंड धडपड असते. आपल्यालाही मानवी हिताच्या विचारांची पेरणीही करायची आहे आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या विधायक विचारांचं जतनही करायचं आहे. त्यासाठी मानवी विकासाच्या आड येणाऱ्या अंधश्रद्धांना दूर सारण. ही आपली नित्याची धडपड असली पाहिजे.

Pages: 48

Description

ज्याला जीवनाचा अर्थ कळलेला आहे, तो मनुष्य श्रमातून मिळणाऱ्या आनंदासाठी तहानलेला असतो, भुकेलेला असतो. आपली सर्जनशीलता गमावली जाता कामा नये, आपलं जगणं निरर्थक बनता कामा नये, अशी उत्कट इच्छा त्याच्या मनात असते. हे मानवी जीवनाचं खरं सौंदर्य आहे. ज्यांना त्या सौंदर्याची ओढ लागत नाही, त्यांचं जीवन निश्चितच अधुरं राहतं. ज्यांना हे सौंदर्य प्राप्त करता येतं, त्यांना जीवन कळलं असं म्हणता येतं.

 

आपण लोकशाही मार्ग स्वीकारलेला आहे. या जीवनपद्धतीमधे कितीही दोष असले, तरी किमान सध्या तरी या पद्धतीला पर्याय देणारी यापेक्षा अधिक निर्दोष पद्धती आपल्याजवळ उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध होण्याची शक्यताही दिसत नाही. आता, एकदा का लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, की संवाद हा एकच पर्याय उरतो आणि म्हणून कितीही त्रास झाला, संयमाचा कितीही अंत पाहिला गेला, तरी अहिंसेचा मार्ग हाच अखेरीस सर्वांच्या हिताचा मार्ग आहे, हे कदापि विसरता येत नाही. म्हणूनच आपल्यापुढचे प्रश्न सोडविण्यासाठी, समस्यांचं निवारण करण्यासाठी आपल्याला अहिंसेच्या मार्गानंच जावं लागेल. हिंसेचा मार्ग कदापि कल्याणाचा नाही आणि आपण तो कधी स्वीकारताही कामा नये. त्याला प्रोत्साहन देणं दूरच, त्याला मान्यताही देता कामा नये.

 

Additional information

Weight 0.70 kg
Pages

48

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परिवर्तन : हिंसेविना/ Parivartan : Hinsevinaa”