मुलूखमाती/Mulookhmati

250.00

वैशिष्ट्यपूर्ण कथनदृष्टीमुळे हा रूपबंध ‘सांगण्या’चा झाला आहे. अपवादभूत ठरावी अशी ही गद्य जिव्हाळ कथनशैली आहे. स्थानिक भू-समाज, जीवनसंबंद्ध दृष्टिकोण, मानवी सहानुभाव, पर्यायी इतिहासदृष्टी, तोंडी इतिहासातले असंख्य बारकावे, प्रत्यक्षता, समाज राजकीय भान, खास महऱ्हाठीपणाचा भूमिशोध, प्रदेश आणि व्यक्तींची विस्मृतिचित्रे व अनोखी गद्यशैली या विशेषांमुळे समकालीन तसेच पूर्वपरंपरा लेखन पार्श्वभूमीवर हे लेखन अपवादभूत ठरते. आत्मपरता आणि समाजपरतेच्या सरमिसळीतून आकाराला आलेल्या या लेखनाने समाज संस्कृतिविषयक लेखनाच्या कक्षा विस्तारित झाल्या आहेत.

Pages: 192

Description

संपत मोरे यांनी गावोगावच्या लोकविलक्षण कहाण्या ‘मुलूखमाती’ मधून सांगितल्या आहेत. व्यक्ती आणि प्रदेशांच्या संयोगातून निर्माण झालेला भू-समाज सांस्कृतिक अवकाशाचा समाजपट या लेखनात केंद्रीय स्वरूपात आहे. त्यात प्रेरक प्रदेश इतिहासाचे पुनःस्मरण आहे. समाजबळ वाहते ठेवणाऱ्या माणसांच्या प्रेरककथांनी त्यास गहिरे रंग प्राप्त झाले आहेत तसेच हद्दपारीच्या वाटेवरील जीवनशैलीच्या कालांतरणाचीही गोष्ट त्यात आहे. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरनायक/वीरनायिकांच्या झुंजार शौर्यगाथेबरोबर कुस्तीसारख्या अस्सल मराठी खेळाच्या ‘अन टोल्ड स्टोरी’ चा हा कथनावकाश आहे.

व्यक्तिचित्रांतून उलगडविलेल्या या समाजचित्रणाची व्याप्ती विस्तृत आहे. त्यासाठी त्यांनी समाजशोधक कथांची नवी वाट शोधली आहे. लिखित परंपरेत न सामावलेला तसेच दुर्लक्षिलेल्या लोकांचा समाजेतिहास त्यातून उलगडविला आहे. प्रत्यक्षातील ‘लोकेतिहासाला व ‘लोकबोलण्या’ला त्यांनी नवी कथननीती दिली आहे. ती मोरे यांच्या विचारघडणीतून निष्पन्न झालेली आहे. व्यवस्था ‘सांगावा न आलेल्या फाटक्या माणसांच्या या शोधकथांनी परिघावरच्या अनाम कहाण्यांचा प्रदेश साकारला आहे. कोळी, बेलदार, हेळवी, मजुरी करणारे तसेच धाडसी, कष्टाळू स्त्रियांची ही उपेक्षासमाजचित्रे आहेत. ‘ती माणसे कोठे आहेत?’ असा विस्तृत प्रदेशशोध त्यामध्ये आहे. प्रत्यक्षातल्या माणसांच्या बोलण्यातून प्रदेश न्याहळल्यामुळे त्यांच्या या समाजवाचनात महाराष्ट्रशोधाची पर्यायी दृष्टी आहे.

 

Additional information

Weight 0.220 kg
Pages

192

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलूखमाती/Mulookhmati”