Description
१८२७-१८९० या कालखंडात होऊन गेलेले जोतीराव गोविदराव फुले म्हणजे ‘बोले तैसा चाले’ या वचनाचा भारताच्या ज्ञात इतिहासातील एक उत्तम आदर्श होय. दुसरीकडे ‘धर्म’ ही मानवजातीच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी संकल्पना होय.
व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हणतात. त्याच धर्तीवर व्यक्ती तितके धर्म, असेही म्हणणे शक्य आहे. याचा अर्थ आपापले अनुभव, चिंतन, उद्देश इत्यादीना अनुसरून धर्माविषयी विविध लोकांच्या विविध भूमिका असतात. त्यांपैकी परस्पर-विरुद्ध अशा दोन टोकांच्या भूमिकांचा उल्लेख पुढीलप्रमाणे करता येईल. धर्म हे सर्व दुःखांचे मूळ असल्यामुळे तो उखडून फेकून दिला पाहिजे, असे काहींना वाटत असते. ‘धर्म’ हा शब्द कानांवर पडला, तरी या लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. याउलट, धर्म हा समाजधारणा करीत असल्यामुळे प्रसंगी आपले वा दुसऱ्याचे रक्त सांडूनही त्याचे रक्षण केले पाहिजे, असे काहींना वाटत असते. ‘धर्म’ हा शब्द कानांवर पडला, तरी त्यांच्या चित्तवृत्ती उल्लसित होतात, उत्तेजित होतात. या दोन भूमिकांच्या मधे आणखी असंख्य भूमिका असतात. आपल्यापुढे आता प्रश्न आहे, तो असा यांपैकी महात्मा फुल्यांची धर्माविषयीची भूमिका नेमकी कोणती होती?






Reviews
There are no reviews yet.