महानिर्वाण तंत्र आणि तथाकथित शैव विवाह/ Mahanirvaantantra Aani Tathaakathit Shaiv Vivaah

40.00

अलीकडे ‘महानिर्वाणतंत्र’ या तंत्रमार्गी ग्रंथातील संदर्भहीन सुटी वचने घेऊन त्यांच्या आधारे काही लोक तथाकथित ‘शैव विवाह’  या संकल्पनेचा आत्यंतिक गौरव करताना आढळत आहेत. हा विवाह जात्यंताच्या म्हणजेच जातिभेद मोडण्याच्या दृष्टीने फार उपयुक्त, आदर्श आणि आजही मार्गदर्शक आहे.

Pages: 32

Description

Mahanirvan tantr tathakathit shaiv vivah

शैव विवाहाची संकल्पना प्रारंभी ज्या हृद्य अपेक्षा निर्माण करते, त्या अपेक्षा ती पूर्ण मात्र करू शकत नाही. वर्णभेद नाकारण्याच्या भूमिकेमुळे या संकल्पनेविषयी प्रचंड आदर वाटू लागतो, पण त्या भूमिकेच्या मर्यादा पाहिल्या, की अपेक्षाभंगाने मन खिन्न, विषण्ण, उदास होते. शैव विवाह स्त्रीपुरुषांनी परस्परसंमतीने करायचा म्हटल्यावर स्त्रीपुरुषसंबंधातील समतेच्या नात्यामुळे मन आनंदाने उत्कंठित होते, पण प्रत्यक्षात तो केवळ तात्पुरत्या सोयीचा मामला आहे, त्यामध्ये उत्कट प्रीतीचा हळुवारपणा वा कोवळीक नाही, हे पाहिल्यावर प्रेम या संपल्पनेच्या लावण्याला आणि माधुर्याला कलुषित केल्याची वेदना वाट्याला येते.

 

Additional information

Weight 50 kg
Pages

32

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महानिर्वाण तंत्र आणि तथाकथित शैव विवाह/ Mahanirvaantantra Aani Tathaakathit Shaiv Vivaah”