महाभारतातील स्त्रिया भाग २ / Mahabhartatil Striya Part 2

150.00

दमयंतीच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आनंदात झाली, पण मध्यंतरी तिची अगदी ससेहोलपट झाली. रेणुकेचे बालपण सुखात गेले, पण तिच्या सुखदुःखांविषयी बेफिकीर असलेल्या तिच्या नवऱ्याने अखेर तिची हत्या घडवली. सुकन्या आणि लोपामुद्रा यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. देवयानीला वैफल्यग्रस्त व्हावे लागले, तर शर्मिष्ठेला दडपणाखाली जगावे लागले. सत्यवती, अंबिका, अंबालिका यांच्या वाट्यालाही वेदना आहेच. निषाद स्त्रीचा प्रस्थापित व्यवस्थेच्या ‘यज्ञवेदी’ वर बळी दिला गेला. गांधारी डोळे असून आयुष्यभर आंधळी राहिली. हिडिंबेने ज्याच्यावर मन जडले त्याची प्राप्ती केली, पण ती त्याचे कायमचे साहचर्य मात्र प्राप्त करू शकली नाही.

Pages: 136

Description

प्राचीन वाङ्मयात आढळणाऱ्या व्यक्तींविषयी आपल्याला विविध माध्यमांतून आणि विविध प्रकारे बरेच काही वाचायला व ऐकायला मिळालेले असते. पण अनेकदा त्या व्यक्तींविषयी मूळ संस्कृत ग्रंथांतून जे काही म्हटलेले असते, ते नेमकेपणाने आपल्यापर्यंत आलेले नसते. स्वाभाविकच, त्या व्यक्तींविषयी काही नेमकी मते बनविण्याच्या दृष्टीने मूळ ग्रंथातील त्यांचे शब्दचित्रण नजरेखालून घालणे उपयुक्त ठरू शकते. महाभारत हा एक विशाल ग्रंथ आहे. त्यामध्ये असंख्य व्यक्तींची वर्णने आहेत. या ग्रंथात स्त्रियांची नाना रूपे आलेली आहेत.

पहिल्या भागात सावित्री, माधवी, शकुंतला, अंबा आणि द्रौपदी यांच्याविषयी महाभारताने केलेल्या लेखनाचे काही विवेचन केले होते. शिवाय, एका जन्मात पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही अस्तित्वांचा अनुभव घेतलेल्या एका काल्पनिक व्यक्तीच्या कथेचीही चर्चा केली होती. आता या दुसऱ्या भागात आणखी काही महत्त्वाच्या स्त्रियांची चरित्रे चर्चेला घेतली आहेत.

Additional information

Weight 0.160 kg
Pages

136

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाभारतातील स्त्रिया भाग २ / Mahabhartatil Striya Part 2”