Description
महाभारतातील या इतरही अनेक व्यक्तींची अनेकदा चरित्रे अनेक मार्गानी आपल्यापर्यंत आलेली असतात. त्यावरून आपल्या काही धारणा बनलेल्या असतात. पण अनेकदा मूळ कथेत काही बाबी वेगळ्याच असतात. हे थोडे अधिक स्पष्ट व्हावे, म्हणून मी तुळसीची म्हणजेच वृंदेची कथा’ संक्षेपाने येथे देतो. ही कथा या पुस्तकात घेतलेली नाही. ती महाभारतातूनही घेतलेली नाही. कथा पुनरुक्त करण्याची येथे वेगळी कथा द्यावी, या हेतूने वृंदेची एका पुराणातील कथा येथे देत आहे. वृंदा ही जालंधर नावाच्या असुराची पत्नी होती. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे जालंधर अजिंक्य बनला होता. देव तर त्याचा पाडाव करू इच्छित होते. मग विष्णूने वृंदेला फसवून तिच्या पातिव्रत्याचा भंग केल्यामुळे जालंधर युद्धात मारला गेला. वृंदेला हे कळले तेव्हा तिने आपले मन पतीकडे लावून अग्रीत उडी घेतली. तिच्या चितेपासून ज्या तीन वनस्पती निर्माण झाल्या, त्यांपैकी तुळस विष्णूला प्रिय झाली. जालंधर वगैरे असुर राजे नीतिमान असूनही वैदिकांनी प्रचाराच्या जोरावर त्यांना बदनाम केले आहे. याचे विवेचन स्वतंत्रपणे व विस्ताराने करणे आवश्यक आहे. तरीही येथे या कथेचे समग्र विवेचन करणे हा प्रस्तुत विषय नसल्यामुळे जालंधर चारित्र्यहीन होता असे वादासाठी गृहीत धरून पुढे जाऊया.






Reviews
There are no reviews yet.