Description
Gudhi ani shankarparvati
भारतातील दूरदूरच्या प्रदेशांतून हजारो वर्षांपासून लोकांनी जपलेल्या परंपरेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत कसे करायचे, हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्न आहे…
…लोक वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या पद्धतींनी त्या दिवशी महोत्सव साजरा करीत असल्याचे दिसते. कुणी वर्षारंभाचा दिवस म्हणून, कुणी गुढी उभारून, कुणी नवरात्र साजरे करून, कुणी पार्वतीच्या विवाहाची तयारी म्हणून, कुणी शक वा संवत सुरू करण्यासाठी म्हणून हा दिवस सणाच्या स्वरूपात साजरा करीत असल्याचे दिसते. भारतीय संस्कृतीपुरते बोलायचे, तर या दिवसाचे महत्त्व फार प्राचीन काळापासून लोकांच्या मनात आहे. काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत, एवढेच नव्हे, तर आग्रेय आशियापर्यंतही त्याचे महत्त्व मानले गेले आहे. सौराष्ट्र, राजस्थान, सिंधपासून आंध्र, ओडिशा, मणिपूरपर्यंत हा दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे महत्त्वाचा मानला गेला आहे. आणखी एक वेगळी गोष्ट- दूरदूरच्या भविष्यकाळापर्यंतही असंख्य भारतीय लोक हा महोत्सवाचा दिवस असल्याचे मानत राहणार आहेत- आपण त्यांच्याबरोबर राहणार, की वेगळी वाटचाल करणार? आपण सर्वांगीण विचार करून या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे !






Reviews
There are no reviews yet.