धर्म की धर्मापलीकडे ?/ Dharm Ki Dharmapalikade ?

170.00

तुम्हाला धर्म हवा की नको, या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे, हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. मानवी कल्याणासाठी धर्माचा स्वीकार करणे योग्य, की धर्म नाकारणे योग्य, असा हा पेच आहे.

SKU: lokayat0002 Category: Tag: Brand:

Pages: 124

Description

हे साधे-सरळ उत्तर

या संदर्भात असेही म्हणता येईल, की तमःस्वरूप धर्माच्या पलीकडे जाणे हा ज्योतिः स्वरूप धर्म आहे आणि ज्योतिः स्वरूप धर्म स्वीकारणे हे तमः स्वरूप धर्माच्या पलीकडे जाणे आहे. आणि हा काही केवळ शब्दांचा खेळ नाही. उलट ‘धर्म’ आणि ‘धर्मापलीकडे’ हे शब्द महत्त्वाचे नसून वक्त्याला या दोन शब्दांच्या माध्यमातून अभिप्रेत असलेला अर्थ महत्त्वाचा आहे, हे यामधून सूचित होते. शब्द काहीही असो; आम्हांला अभिप्रेत असलेल्या अर्थाच्या बाबतीत आमच्या मनात शंका वा द्विधा वृत्ती नाही. आम्हांला अज्ञान नको, आम्हांला द्वेष नको. आम्हांला प्रकाश हवा. आम्हांला माणूसकी हवी. आम्हांला हवे ओठा-ओठांवर प्रसन्न व मधुर स्मितहास्य, आम्हांला हवा हृदया हृदयांमध्ये उत्कट आनंदाचा झरा. धर्म आमच्यासाठी हे सगळे करीत असेल, तर तो आमचा मित्र, आमचा सखा. तो आम्हांला हवा. मग आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याची भाषा करणार नाही. तो आमच्यासाठी हे करणार नसेल, तर आम्हांला त्याची संगत नको. मग मात्र आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचा हर तन्हेने प्रयत्न करू. माझ्या दृष्टीने ‘धर्म की धर्मापलीकडे’ या प्रश्नाचे हे साधे-सरळ उत्तर आहे.

Additional information

Weight 0.150 kg
Pages

124

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धर्म की धर्मापलीकडे ?/ Dharm Ki Dharmapalikade ?”