देवगिरीचे यादव उर्फ जाधव/ Devgiriche Yadav Urf Jadhav

325.00

देवगिरीच्या यादव राजवंशाचे महत्त्व महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यास नव्याने समजावून सांगण्यास नकोच. (परंतु यादवांचा राजकीय इतिहास समग्र बारकाव्यांसह सांगणारा एकही ग्रंथ मराठीत नव्हता.)

यादवांचा संस्कृत, मराठी, कानडी शिलालेखांच्या व ताम्रपटांचा या ग्रंथात उपयोग करून घेतला आहे. महानुभाव साहित्यात येणारी यादवांविषयीची माहिती नीट तपासून उपयोगात आणली आहे.

Pages: 248

Description

प्रा. अर्जुन जाधव यांच्या ‘देर्वागरीचे यादव उर्फ जाधव’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य है आहे, की आत्तापर्यंतचा यादवांचा इतिहास शंकरदेव किंवा हरपालदेवाच्या पुढे जात नव्हता. या घराण्याची यादव ऊर्फ जाधव म्हणून पुढील परंपरा गोविंददेवापासून ते लखुजी जाधवांपर्यंत म्हणजेच इ. स. १३२४ ते १६२९ पर्यंतच्या इतिहासाची सूत्रबद्ध व वास्तवदर्शी मांडणी करून लखुर्जीच्या ऐतिहासिक कार्यातून स्वराज्याचे बीजारोपण कसे झाले, लखुजींनी स्वपराक्रमावर ‘सिंदखेडराजा’ जहागिरीचे राजवैभव कसे प्राप्त केले, तसेच लखुजी जाधवांच्या गुणवैशिष्ट्यांचे यथार्थ केलेले विश्लेषण स्वराज्य बांधणीस कसे साहाय्यभूत ठरले, याचा साद्यंत लेखाजोखा विविध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधाराने प्रस्तुत केला आहे. लखुजी स्वराज्य संस्थापक होऊ शकले नाहीत. त्यांनी समाजहित आणि सुधारणावादी धोरण आपल्या जहागिरीत राबविले. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ या लखुजी जाधवांच्या कर्तबगार कन्या होत्या. मातोश्री जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली आणि आपल्या पित्याचे आणि पतीचे स्वप्न पुत्राच्या माध्यमातून साकार केले. इतिहासकार डॉ. संतोष बाहेकर म्हणतात, त्याप्रमाणे ‘जिजाऊला स्वराज्य स्थापनेची वैचारिक प्रेरणा जाधव घराण्याच्या गौरवशाली इतिहासातूनच प्राप्त झाली आहे

प्रा.डॉ. सोमनाथ रोडे

Additional information

Weight 0.260 kg
Pages

248

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देवगिरीचे यादव उर्फ जाधव/ Devgiriche Yadav Urf Jadhav”