Description
मराठ्यांच्या असंख्य कुळांचे वृज्जी गणाशी असणारे नाते सिद्ध करण्यात लेखकाने यश मिळविले आहे. हरप्पा पतनानंतर अडीच हजार वर्ष होऊन देखील हरप्पा व वृज्जी गण यांचा सांस्कृतिक वारसा अखंडपणे व ठळकपणे जपण्यात महाराष्ट्राची कुळे इसवी सन दहाव्या -बाराव्या शतकापर्यंत यशस्वी झाली होती. हरप्पापतन, आर्य-अनार्य संघर्ष, बळीवंश इ. विषयांचे लेखकाने चित्रिकरण केले असून त्यासाठी त्याने कुळचिन्हे (ढींशा) अभ्यासली आहेत. महाराष्ट्राची संस्कृती ही यक्ष-नाग, पिशाच संस्कृती असून मराठीची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये शोधण्यापेक्षा द्रविड व पैशाची भाषेत शोधली पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची जडणघडण कशी झाली व तिचे मूळ स्वरूप काय होते, याबाबत नवीन दृष्टी देणारे हे संशोधन आहे.






Reviews
There are no reviews yet.