चार्वाक दर्शन (पुस्तिका)/Charvak Darshan (Pustika)

40.00

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात असंख्य दर्शने अस्तित्वात आलेली असली, तरी त्यांपैकी नऊ दर्शने मानली प्रमुख मानली जातात. दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. या दर्शनांची आस्तिक व नास्तिक अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा (वेदान्त), सांख्य, योग,न्याय आणि वैशेषिक ही सहा आस्तिक दर्शने ‘षडदर्शने’ म्हणून विख्यात आहेत. बौद्ध, जैन आणि चार्वाक ही तीन दर्शने नास्तिक मानली जातात.

SKU: lokayat0078 Category: Tag: Brand:

Pages: 40

Description

चार्वाकदर्शन ही एक जीवनदृष्टी आहे. जीवन सम्यक रीतीने जगण्याची एक विज्ञाननिष्ठ पद्धत आहे. या दर्शनानुसार जीवन ही एक वस्तुस्थिती आहे, स्वप्न वा भ्रम नव्हे. जीवनातील समस्या सोडवावयाच्या असतात, लपवावयाच्या नसतात. या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणाने त्यांना सामोरे जावयाचे असते, त्यांच्यापासून दूर पळावयाचे नसते. म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करताना चार्वाकदर्शनाने खोटी प्रतिष्ठा, दुटप्पीपणा इत्यादींना थारा न देता प्रत्येक वेळी वास्तववादी, जीवनवादी भूमिका स्वीकारली. मानवी शरीर एकदा नष्ट झाले, की पुन्हा प्राप्त होत नसते; म्हणूनच प्राप्त झालेल्या शरीराचा शहाणपणाने जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. आपण जगण्यासाठी जन्माला आलो आहोत, मरण्यासाठी नव्हे. मृत्यू हा अटळ असेल, परंतु म्हणून काही तो जीवनाचा उद्देश ठरू शकत नाही. जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पारलौकिक वा कल्पित अशा अतिमानवी शक्तींचा आश्रय घेण्याची गरज नाही. मानवनिर्मित आणि विवेकाधिष्ठित समाजव्यवस्था या उद्देशाची पूर्ती करू शकेल. चार्वाकदर्शन हे असे आहे वास्तववादी, जीवनवादी, मानववादी!

डॉ. आ. ह. साळुंखे

Additional information

Weight 0.40 kg
Pages

40

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चार्वाक दर्शन (पुस्तिका)/Charvak Darshan (Pustika)”