Description
मानवी जीवनात इतिहासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण माणूस जुन्याचा बोध घेऊन नव्याचा शोध घेत असतो. जागतिक इतिहासाबरोबरच भारतीय इतिहास हा प्रेरणादायी आहे. भारतीय इतिहासलेखन हे म्हणावे तेवढे निरपेक्ष अंगाने झालेले नाही. ज्यांनी इतिहास निर्माण केला त्यांनी इतिहास लिहिलेला नाही याउलट ज्यांनी काहीच केले नाही त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. हे आपल्या भारतीय इतिहासलेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या इतिहासलेखनाला प्राचीन वारसा आहे, त्याला एक धार्मिक आणि पौराणिक पद्धतीचे वळण आहे.
ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर इतिहासकारांच्या मांडणीत फार मोठी तफावत आपल्याला दिसून येते. भारतातील जातीय व्यवस्थेची झालर ब्राह्मणी इतिहासकारांच्या लेखनात दिसून येते तर ब्राह्मणेतर इतिहासकारांनी इतिहास हा धर्मनिरपेक्षतेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोघांनीही आपल्या विचारांचा अहंकार जोपासलेला आहे. शिवप्रतीकांना त्यामुळे एका अर्थाने न्याय मिळाला नाही असे वाटते. या दोन्ही इतिहास प्रवाहांचा अभ्यास करून मी ब्राह्मण व ब्राह्मणेतर इतिहासलेखन पद्धतीवर भाष्य करण्याचा ‘प्रयत्न केलेला आहे.






Reviews
There are no reviews yet.