बौद्ध धर्मातील मार (दुष्ट प्रवृत्ती) संकल्पना/ Bauddh Dharmatil Maar (Dusht Pravrutti) Sanklpana

310.00

सद्यपरिस्थितीत देखील आपल्या आजूबाजूला अनेक माणसांमध्ये माराची प्रवृत्ती दिसून येते, ज्यामुळे ती माणसे या ना त्या प्रकाराने आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे दुष्ट शक्तींच्या प्रभावातील मानसिक दुर्बलता आणि दुर्गुण यांना ज्ञान तसेच सद्गुणांच्या बळावरच हरवले जावू शकते.

Pages: 223

Description

बौद्ध साहित्यातील मार ही एक महत्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. माराने आपल्या सुंदर मुलींच्या मदतीने गौतम बुद्धांना त्यांच्या निर्वाण प्राप्तीच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु मनावर पूर्ण नियंत्रण असणाऱ्या गौतम बुद्धांनी माराचे हे प्रयत्न अयशस्वी करून आपले निर्वाण प्राप्तीचे ध्येय साध्य केले. अर्थात मार केवळ गौतम बुद्धांच्या मार्गात अडथळे आणतो असे नाही तर भिक्षु, भिक्षुणी तसेच आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या प्रयत्नांना अराफल करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतो. म्हणूनच आपल्या यशोमार्गाच्या आड येणाऱ्या या माराची व्यक्तिरेखा आणि संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या संकल्पनेचा तात्त्विक, सामाजिक आणि मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे. याशिवाय गौतम बुद्धांनी जरी तृष्णा ही दुःखाचे कारण आहे असे सांगितले असले तरी ही तृष्णा कोण कोणत्या मार्गाने आपल्या मनावर गारुड करते आणि आपल्या मार्गात अडथळे आणते हे समजून घ्यायचे असेल तर मार ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे.

Additional information

Weight 0.250 kg
Pages

223

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बौद्ध धर्मातील मार (दुष्ट प्रवृत्ती) संकल्पना/ Bauddh Dharmatil Maar (Dusht Pravrutti) Sanklpana”