Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर । हे व्यक्तिमत्त्व तसे एका विशेषणाच्या चाकोरीत मावणे अशक्यच ठरेल. बेशकिमती कोहिनूर हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या याच ‘अनेक पैलूंपैकी ‘लेखक’ हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू ठरलेला आहे. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेली ग्रंथसंपदा, ही येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा ही इतिहास, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, धर्म, समाजकारण, जात अशा विविध विषयांनी श्रीमंत झालेली आहे. त्यांनी जे लिखाण केले व ज्याला ग्रंथांचे स्वरूप दिले असे एकूण २३ ग्रंथ सांगता येतील. यांमधील काही ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले, तर काही त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित केले गेले. बाजारात उपलब्ध असलेल्या या ग्रंथांची एकूण पृष्ठसंख्या ३,५०० च्या जवळपास आहे. एकूण पृष्ठसंख्या पाहता असे वाटते, की एखादा गाढा अभ्यासक व विद्वान माणूसच या ग्रंथांचा अभ्यास करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे लेखनकार्य केवळ विद्वानांपुरतेच मर्यादित न राहता सर्वसामान्य वाचक व तरुण पिढी या सर्वांपर्यंत सहज पोहचायला हवे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
डॉ. वैभवकुमार शिंदे






Reviews
There are no reviews yet.