Description
शहाणपण हवे, तर शहाण्या माणसाकडेच जावे
ज्ञान वगैरेसारखी एखादी उत्तम गोष्ट आपल्या व्यक्तिमत्त्वात नसेल, ती आपल्याला हवी असेल आणि ती दुसऱ्या कोणाकडे असेल, तर ती प्राप्त करण्यासाठी आपण त्याच्या सहवासात राहणे, हाच योग्य मार्ग होय. आपल्याला ऊब हवी असेल, तर आपण अग्नीकडे जातो. गारवा हवा असेल, तर पाण्याकडे वा सावलीकडे जातो. फळे हवी असतील, तर वृक्षाकडे जातो. त्याच पद्धतीने शहाणपण हवे असेल, तर शहाण्या माणसाकडेच गेले पाहिजे. आपण प्रकाश मिळवण्यासाठी अंधाराशी मैत्री करीत नाही, ज्याच्याकडे प्रकाश देण्याची शक्ती असते त्याच्याच प्रांगणात पाऊल टाकतो.






Reviews
There are no reviews yet.