आपणही फुलू या, इतरांनाही फुलवू या !/Aapanhee Phuloo Yaa, Itaraannaahee Phulvoo Yaa!

70.00

प्रस्तुत पुस्तकात डॉ. साळुंखे यांची एकूण पाच व्याख्यानं अंतर्भूत केली आहेत. त्यांपैकी दोन व्याख्यानं महानुभाव पंथाविषयी आणि मराठी भाषेच्या जडण-घडणीमधील श्रीचक्रधर स्वामींच्या योगदानाविषयी आहेत. तिसरे व्याख्यान मुस्लिम समाजाच्या समस्यांचा वेध घेणारे व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे. चौथे व्याख्यान ‘शेती आणि जागतिकीकरण’ या विषयावर आहे. पाचवे व्याख्यान परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे आहे.

Pages: 64

Description

राजकीय सत्तांपेक्षा सांस्कृतिक सत्ता अधिक महत्त्वाच्या

आजच्या अवघड वाटणाऱ्या काळात फार धैर्यानं उभं राहण्याची गरज आहे. निराश होम्याची वा वैफल्यग्रस्त होण्याची, आता आपण सर्व काही गमावलं आहे, असं मानण्याची ही वेळ अजिबात नाही. सामाजिक जीवनात चढ-उतार येत असतात, लाटा येतात-जातात. राजकीय सत्तांपेक्षा सांस्कृतिक सत्ता महत्त्वाच्या असतात, याकडं बहुजनांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मला खंत वाटते ती अशी, की बहुजनांतले लोक राजकीय सत्तेच्या मागं धावणारे असले, तरी सांस्कृतिक सत्ताधाऱ्यांचे ते गुलामच राहीले आहेत; मग ते राजकीय सत्तेत असोत अथवा नसोत ! तुमच्या जीवनाची सगळी मूल्य जर दुसराच कुणीतरी ठरवत असेल, तर तुमच्याकडं जळता जळत नाही इतकी इस्टेट, सत्ता-संपत्ती असून तिचे करायचं काय ? तुम्ही मनानं गुलामच असाल, तर ती सत्ता-संपत्ती वैभव काय कामाचं ?

Additional information

Weight 0.90 kg
Pages

64

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपणही फुलू या, इतरांनाही फुलवू या !/Aapanhee Phuloo Yaa, Itaraannaahee Phulvoo Yaa!”